Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी शरद पवारांच्या भेटीसाठी उदय सामंत 'सिल्व्हर ओक'वर, नेमकं काय चाललंय?

शरद पवारांच्या भेटीसाठी उदय सामंत ‘सिल्व्हर ओक’वर, नेमकं काय चाललंय?

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यात काल (गुरुवार) सकाळच्या सुमारास सिल्व्हर ओकवर भेट झाली. तब्बल दोन तास या दोघांमध्ये बंददाराआड चर्चा झाली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. मात्र, गौतम अदानी यांच्या भेटीनंतर आज शिवसेना नेत आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकेबाबत त्यांनी भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी उदय सामंत यांनी शरद पवारांची तीन वेळा भेट घेतली.

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार आहे. यावेळी शिंदे गटासह भाजपचे नेते या बैठकीला हजेरी लावणार आहे. मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर एकनाथ शिंदेंनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचा दौरा रद्द करत मुंबईत बैठकीला रवाना झाले आहेत.

- Advertisement -

नेमकी भेट कशासाठी?

उदय सामंत यांनी तिसऱ्यांदा उदय सामंत यांची सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर उदय सामंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, नाट्य परिषदेच्या निवडणुकीबाबत त्यांनी भेट घेतली होती.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच गौतम अदानींवरील हिंडेनबर्गच्या अहवालावर शरद पवार यांनी अदानींचे समर्थन केले होते. तसेच देशात अदानी यांच्या प्रकरणापेक्षा महत्त्वाचे प्रश्न आहेत. हिंडेनबर्ग हे नावही मी कधीच ऐकले नाही. मग त्या कंपनीच्या अहवालावर विश्वास कसा ठेवायचा असे प्रश्नचिन्हही शरद पवार यांनी हिंडेनबर्गच्या दाव्यावर उभारले आहे. त्यानंतर आता थेट अदानींनी पवार यांची भेट घेतल्याने पडद्यामागे नक्की काय शिजतयं यावर जोरदार चर्चाही रंगल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला अजित पवारांची अनुपस्थिती?

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या भाजपाप्रवेशाची चर्चा रंगली होती. अचानकपणे अजित पवार यांचे नॉट रिचेबल होणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणे, शिंदे-फडणवीस सरकार कशा पद्धतीने स्थिर राहील याबाबत माहिती देणे, ईव्हीएमचे समर्थन करणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची प्रशंसा करणे अशा विविध कारणास्तव ते भाजपामध्ये जाणार असल्याचे ठोकताळे बांधण्यात आले होते. मात्र अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ही शक्यता फेटाळत, या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

महाविकास आघाडीच्या या दोन नेत्यांमध्ये होत असलेल्या वादांवरून हा संशय आणखी बळावला आहे. राष्ट्रवादीच्या फुटीच्या बातम्या समोर येत असल्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभागीय कार्यकर्ता शिबीर घाटकोपरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी पत्रकात खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतरही नेत्यांची नावं आहेत. परंतु यात अजित पवारांचे नाव वगळण्यात आले आहे. अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. तसेच त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आढावा घेतला. मात्र, ते मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता शिबीरला अनुपस्थित राहणार असल्याचं सांगतिलं जात आहे.

दरम्यान, गौतम अदानी यांच्या भेटीनंतर उदय सामंत यांनी भेट घेतली असली तरी त्यांचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. परंतु गौतम अदानी यांनी पवारांची भेट का घेतली होती, हे अद्यापही समोर आलेलं नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील भूमिका काय आहे?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : शरद पवार आणि गौतम अदानी यांची सिल्व्हर ओकवर भेट, चर्चांना उधाण


 

- Advertisment -