घरताज्या घडामोडीप्रभाग रचनेचा निर्णय कोणाच्याही दबावाखाली नाही, उदय सामंत यांचा खुलासा

प्रभाग रचनेचा निर्णय कोणाच्याही दबावाखाली नाही, उदय सामंत यांचा खुलासा

Subscribe

महापालिकांमध्ये प्रभागरचना बदलण्याचा निर्णय हा भाजपच्या दबावामुळे घेण्यात आल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते तेव्हा देखील त्‍यांनी शिवसेनेच्या दृष्‍टीने हा प्रस्‍ताव नुकसानीचा असल्‍याचे सांगत या प्रस्‍तावाला विरोध केला होता. परंतु आता जो निर्णय घेण्यात आला आहे तो शिवसेनेच्या फायद्याचा असल्‍याचा खुलासा माजी मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. येत्या १५ ऑगस्‍टपूर्वी निश्चितच राज्य मंत्रिमंडळाचा विस्‍तार होणार असून पालकमंत्री आपापल्‍या जिल्‍हयात ध्वजवंदन करतील, असेही त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारने गेल्‍या वर्षी तीन सदस्‍यीय प्रभागरचना केली होती. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने महापालिकांमध्ये प्रभागरचना बदलण्याचा निर्णय घेतला आहे. २०१७ च्या प्रभागांच्या संख्येनुसारच महापालिकांची निवडणूक घेण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना त्‍यांच्याच खात्याने आणलेला प्रस्‍ताव त्‍यांनी मुख्यमंत्रिपदावर आल्‍यानंतर बदलला, असा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना सामंत यांनी या आरोपाचे खंडन केले.

- Advertisement -

भाजपच्या दबावामुळेच प्रभाग रचनेचा निर्णय घेतल्याचा आरोप चुकीचा आहे.एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना या प्रस्‍तावाला विरोध केला होता. शिवसेनेच्या दृष्‍टीने हा प्रस्‍ताव नुकसानीचा असल्‍याचे ते म्‍हणाले होते.मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या स्‍वभावाचा फायदा घेत शिंदे यांचा विरोध डावलून हा निर्णय घेण्यात आला. आता मात्र जो निर्णय घेण्यात आला आहे तो शिवसेनेच्या आणि शिवसैनिकांच्या फायदयाचाच असल्‍याचे उदय सामंत म्‍हणाले.

दरम्यान, शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांना धमक्‍यांचे फोन आल्‍याचे मान्य करतानाच मला देखील धमकीचे फोन येत आहेत, अशी माहिती सामंत यांनी दिली. ज्या दिवशी पुण्यात माझ्या वाहनावर हल्‍ला झाला त्‍याच्या दुस-याच दिवशी अकोल्यातून मला धमकीचा फोन आला होता. मात्र अशा टुकार लोकांकडे मी लक्ष देत नाही. आक्रमक कार्यकर्ते आमच्याकडे नाहीत असे नाही. मात्र ती आमची राजकीय संस्‍कृती नाही, असे उदय सामंत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : दोनदा 10वीत नापास झालेल्या राऊतांचा कायद्याशी संबंध काय?, निलेश राणेंची खोचक टीका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -