घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : उदय सामंत यांचे बंधू किरण यांची राजकीय खेळी, पोहोचले...

Maharashtra Politics : उदय सामंत यांचे बंधू किरण यांची राजकीय खेळी, पोहोचले वडेट्टीवारांच्या भेटीला

Subscribe

राज्यात सध्या निवडणुकीच्याबाबत विविध चर्चा सुरू असताना उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली आहे.

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल हे कधीही वाजू शकते. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये राजकीय पक्ष वाटले गेले आहेत. ज्यामुळे यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. कोणता पक्ष किती जागांवर निवडणुका लढवणार, हे निश्चित झालेले नाही. ज्यामुळे लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून तिकिट मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात सध्या निवडणुकीच्याबाबत विविध चर्चा सुरू असताना उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली आहे. किरण सामंत हे वडेट्टीवार यांची भेट घेण्याकरिता थेट त्यांच्या घरी पोहोचल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. (Uday Samant brother Kiran Samant met Vijay Wadettiwar)

हेही वाचा… Supriya Sule : कॅबिनेट भुजबळांचे ऐकत नाही हे दुर्दैव, सुळेंचे सरकारवर टीकास्त्र

- Advertisement -

शिवसेना (शिंदे गट) नेते आणि सरकारमधील मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. किरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु, या लोकसभेवर आधीच भाजपाचे लक्ष असल्याने आणि त्यातही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे या जागेवरून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे या लोकसभेच्या जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्याचमुळे की काय आज किरण सामंत यांनी विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली आहे का? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

किरण सामंत यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. साधारणतः 15 ते 20 मिनिटे या दोघांमध्येही चर्चा झाली आहे. सिंधुदुर्गातील विकासकामे आणि मराठा आरक्षणावर या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. परंतु, अचानक ही भेट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी किरण सामंत यांनी त्यांच्या स्टेटसला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मशाल चिन्ह पोस्ट केले होते. ज्यामुळे एक भाऊ शिंदेंच्या सोबत तर दुसरा भाऊ ठाकरेंसोबत अशी चर्चा रंगली होती. तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला “मी… मी किरण रवींद्र सामंत… रोकेगा कौन?” असा स्टेटस शेअर केल्याने ते नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे आजच्या या भेटीने किरण सामंत हे काँग्रेसच्या तर वाटेवर नाही ना, असा सवाल उपस्थित झाला आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर दावा केला असला तरी, काँग्रेसकडे या लोकसभेत भक्कम असे नेतृत्व नाही. ज्यामुळे महाविकास आघाडीला किंवा काँग्रेसला किरण सामंत यांच्या पक्ष प्रवेशामुळे फायदाच होणार आहे. कारण किरण ऊर्फ भैय्या सामंक अशी ओळख असलेले किरण हे रत्नागिरीच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जातात. लोकांचे प्रश्न मार्गी लावणे, विविध कामे चोखपणे हाताळणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. बांधकाम व्यवसायामध्ये असलेले किरण सामंत यांची एक यशस्वी उद्योजक म्हणूनही ओळख आहे. उच्च शिक्षित असलेले किरण सामंत यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये गोल्ड मेडल देखील मिळवलेले आहे. सध्या किरण सामंत महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील असून विविध क्षेत्रात त्यांचा राबता दिवसेंदिवस वाढत आहे. पडद्यामागे असलेले किरण सामंत उदय सामंत यांच्यापाठी खंबीरपणे उभे असतात. त्यामुळे रत्नागिरीमध्ये त्यांना किंगमेकर म्हणून ओळखले जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -