घरताज्या घडामोडीGoa assembly election 2022 : भाजप गरजेपुरता कार्यकर्ते आणि नेत्यांचा वापर करतंय,...

Goa assembly election 2022 : भाजप गरजेपुरता कार्यकर्ते आणि नेत्यांचा वापर करतंय, उदय सामंतांची टीका

Subscribe

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गोव्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना गोव्यातून विधानसभेची निवडणूक लढणार आहे आणि नक्कीच यश संपादित करतील. गोव्यातील भूमिपुत्रांचे आणि तरूणांचे प्रश्न सोडवत असताना महाराष्ट्रामध्ये राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी जे काम केलंय. त्यांच्या नेतृत्त्वाखाली गोव्यामध्ये देखील तरूण- तरूणींची सक्षम पिढी ही स्वयंरोजगाराच्या जीवावर उभी करण्याचा मानस हा शिवसेनेचा आहे. त्यामुळे शिवसेनेने गोव्यातून जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असं उदय सामंत म्हणाले.

भाजप गरजेपुरता कार्यकर्ते आणि नेत्यांचा वापर करतंय

पक्षात अनेक मत-मतांतरे असू शकतात. तसंच मत-मतांतरे आहेत हे आपल्याच माध्यमातून मी पाहत आहे. कुणाची ताकद किती आणि काय आहे. हे सर्व देश बघतोय. त्यामुळे आमचीच मक्तेदारी आणि आम्हीच फक्त राज्य जिंकू शकतो. अशा पद्धतीची एक गर्विष्ठपणाची भावना जी भाजपमध्ये निर्माण झालेली आहे. त्या भाजपच्या मंडळींनी मनोहर पर्रिकर यांच्या चिरंजीवाला देखील उमेदवारी दिली नाही. तसेच माजी मुख्यमंत्र्यांना देखील उमेदवारी दिली नाही. त्यामुळे गरजेपुरता प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि नेत्याचा वापर कशा पद्धतीने करून घ्यायचा, हे सर्व राजकारण गोव्यातील लोकांना समजायला लागलं आहे. त्यामुळे परिवर्तन निश्चित असल्याचं मला वाटतंय, असं म्हणत उदय सामंत यांनी भाजपवर टीका केली आहे.

- Advertisement -

या परिवर्तनामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना देखील अग्रस्थानी असणार आहे. त्यामुळे निवडणुकीचं नियोजन नक्की कसं चाललेलं आहे. हे बघण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी मला गोव्यामध्ये पाठवलेलं आहे.

शिवलीमधील उमेदवारामध्ये बदल

शिवली उमेदवार जो पहिल्या नऊ जणांच्या यादीमध्ये होता. तो काही कारणास्तव बदलण्यात आल्याची वस्तूस्थिती खरी आहे. शिवलीमधून भीमसेन परेरा यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु आता त्यांच्या पत्नीला त्या ठिकाणी विधानसभेचं तिकिट देण्यात आलेलं आहे. एखाद्या विधानसभेच्या उमेदवाराकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहिलं असता त्याच्या कुटुंबातल्या महिलेला तिकीट देणं हा काही गुन्हा नाहीये.

- Advertisement -

शिवसेनेकडून ९ उमेदवारांची यादी जाहीर

गोवा विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेने आपल्या ९ उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर केली. शिवसेना गोव्यात १० ते १२ जागी उमेदवार उतरवणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. तसेच पणजीमधून शैलेंद्र वेलिंगकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


हेही वाचा : Joe Biden Insults Journalist: महागाईवर प्रश्न विचारताच राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पत्रकाराला केली शिवीगाळ


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -