मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर महाविद्यालये ऑफलाईन सुरू करणार, उदय सामंतांची माहिती

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सर्व शाळा सुरु होणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे महाविद्यालयांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यावर उदय सामंत यांनी माहिती दिली आहे.

Uday Samant reaction on narayan Rane's allegations home reckey
'साधा फोन केला असेल तर किंमत मोजायला तयार' उदय सामंतांचे राणेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मान्यतेनंतर महाविद्यालये ऑफलाईन सुरु करण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सोमवारपासून शाळा सुरु करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु महाविद्यालये सुरु होणार का? असा संभ्रम निर्माण झाला आहे. महाविद्यालये सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवला आहे. कोरोना परिस्थितीचा विचार करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. राज्यात ऑमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि ओमिक्रॉनचा आढावा घेऊन मुख्यमंत्री महाविद्यालये प्रत्यक्षात सुरु करण्याचा निर्णय घेतील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सर्व शाळा सुरु होणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे महाविद्यालयांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यावर उदय सामंत यांनी माहिती दिली आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात उच्च व तंत्र विभागाकडून मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

सोमवारपासून शाळा सुरु होणार

राज्यातील शाळा सोमवारपासून प्रत्यक्षात सुरु करण्यात येणार आहेत. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याला परवानगी दिली आहे. स्थानिक प्रशासन कोरोनाचा आढावा घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेऊ शकतात. तसेच शाळा प्रशासनही स्थानिक कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरु करण्याबात निर्णय़ घेऊ शकतात अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.


हेही वाचा : विद्यापीठे, महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत कठोर नियमावली करणार- उदय सामंत