प्रतिशिवसेना भवनावरून उदय सामंतांचा खुलासा, म्हणाले जनतेला भेटता येण्यासाठी…

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर आम्ही मूळ पक्ष असल्याचा दावा केला होता. तसंच, चिन्हावरही दावा करण्यात येत आहे. दरम्यान, आता दादरमध्येच शिंदे गटाचं मुख्यालय बांधणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याप्रकरणी आमदार उदय सामंत यांनी खुलासा केला आहे. दादरमधील मुख्यालय म्हणजे प्रतिशिवसेना भवन नसून शिवसेना भवनाबद्दल काहली आदर होता आणि उद्याही राहील, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – शिंदे गटाकडून मुंबईसाठी रणनीती; दादरमध्ये मुख्यालय बांधणार, जागोजागी शाखा उभारणार

उदय सामंत यांनी ट्विट करून, ‘मुंबई दादर येथे प्रति शिवसेना भवन मा. एकनाथजी शिंदे करत आहेत हा गैरसमज पसरवला जात आहे..मा. मुख्यमंत्री महोदयांना सर्वसामान्य जनतेला भेटता यावं ह्यासाठी मध्यवर्ती कार्यालय असावे आमचा प्रयत्न आहे..शिवसेना भवनबद्दल आम्हाला कालही आदर होता उद्याही राहील.’


“मुंबईवर ठाकरे गटाचं राज्य आहे, असा आभास निर्माण केला जातोय. मात्र मुंबईकर शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंवर नाराजी आहे. कारण ते मुख्यमंत्री असताना कोणतीही कामं झाली नाहीत. एकाही बेरोजगाराला नोकरी मिळाली नाही. त्यामुळे आता लवकरच स्वतंत्र शाखा उभारल्या जातील, शाखाप्रमुखांची घोषणा होईल. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं काम जोरदार सुरू होईल. शिंदे साहेबांच्या कामाची गती पाहता त्यांना चांगल्या कार्यालयाची गरज आहे. त्यामुळे दादरमध्येच त्यांचं एक मुख्य कार्यालय असेल. त्यांच्या नेतृत्वाखाली इतर शाखा काम करतील”, असं सदा सरवणकर यांनी शुक्रवारी म्हटलं होतं.

हेही वाचासंजय राऊतांचं तुरुंगातही वाचन-लिखाण सुरूच, वाचा दिनक्रम!

पहिली शाखा मानखुर्द येथे

मुख्यालयाच्या बातमीनंतर शिंदे गटाकडून प्रति शिवसेना भवन बनवण्यात येणार असल्याचा अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे उदय सामंत यांनी वरील खुलासा केला आहे. तसेच, शिंदे गटाटी पहिली शाखा आज मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर येथी स्थापन झाली आहे. या शाखेचं उद्घाटन राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.