घरमहाराष्ट्रUday Samant : मंत्रिपद कोणी दिलं? उदय सामंतांनी घेतले एकनाथ शिंदे, मिलिंद...

Uday Samant : मंत्रिपद कोणी दिलं? उदय सामंतांनी घेतले एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकरांचे नाव

Subscribe

मुंबई:उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कोकणतील नेत्यांवर टीकास्त्र डागलं. मंत्री उदय सामंत यांच्यावर त्यांनी टीका केली. त्यानंतर आता उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्याला मंत्रीपद हे जरी उद्धव ठाकरे यांनी करून दिलं असलं तरी याचे सर्व श्रेय विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना जाते. त्यामुळे केलेल्या मदतीच्या जाणीव ठेवणारे आम्ही आहोत. या दोघांशिवाय शिवसेनेत मला कुणीही मदत केली नाही आणि मंत्रीपदाचे खोटे श्रेय कोणी घेऊ नये, असा पलटवार उदय सामंत यांनी मंगळवारी केला. (Uday Samant Who gave the ministership Uday Samant clearly said They said truth telling competition)

नेमकं काय म्हणाले उदय सामंत?

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि आताही आहे. आता जो बालेकिल्ला आहे तो एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेचा आहे. व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येकाची नार्कोटेस्ट केली असतील तर त्यांच्यासोबत किती लोक आहेत आणि शिंदेंसोबत किती येणार आहेत ते दिसले असते. कोकणात काहीही बदल झालेला नाही. कोकणातील दोन्ही जागेवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील. आमच्या संघटनेवर, सरकारवर आणि भविष्यातील निवडणुकीवर उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा काहीही परिणाम झालेला नाही. माझ्या मंत्रिपदाचे आणि पक्ष प्रवेशाचे श्रेय कोणी घेऊ नये, असं प्रत्युत्तर मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.

- Advertisement -

सामंतांनी सांगितला तो किस्सा

उदय सामंत म्हणाले की, खरं बोलायची स्पर्धा ठेवली पाहिजे. मी त्यांच्या वयाचा मान ठेवतो. मी मातोश्रीवर जात नव्हतो हे जगजाहीर आहे. मिलिंद नार्वेकरांनी मध्यस्थी केली आणि मला मातोश्रीवर घेऊन गेले. मातोश्रीवर घेऊन गेल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेब गेल्यानंतर हा माझ्यासाठी सुखद धक्का आहे की एक राज्यमंत्री माझ्या पक्षात प्रवेश करत आहे. तुम्हाला आमच्याकडून निवडणूक लढवावी लागेल. तेव्हा भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळी झाली होती. त्यातून मी निवडणूक लढलो आणि 41 हजार मतांनी निवडून आलो. प्रवेशावेळी मला सांगितलं सत्ता आल्यानंतर त्यात पाच जरी मंत्री झाले तरी तुम्हाला आम्ही मंत्री करू. पण मी जबाबदारी सांगतो, म्हाडाचे अध्यक्ष ठाकरेंनी मला केले असं ते भाषणात बोलले. परंतु लांजा गेस्टहाऊसला मला देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. तुला मंत्रिपद मिळेल न मिळेल परंतु म्हाडा प्राधिकरण तू चांगल्यारितीने सांभाळू शकतोस, त्यामुळे तुला अध्यक्ष बनवतो आहे, असं सांगितल. त्यामुळे ते कोणामुळे मिळाले हे कळाले.

(हेही वाचा: Shiv sena Thackeray : अजित पवार गटाला मोठा धक्का; दत्ता गोर्डेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -