घरताज्या घडामोडीराज्यातील MHT CET परीक्षा पुढे ढकलली, या महिन्यात परीक्षा होणार, उदय सामंतांची...

राज्यातील MHT CET परीक्षा पुढे ढकलली, या महिन्यात परीक्षा होणार, उदय सामंतांची माहिती

Subscribe

राज्यातील एमएचटी सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मागील आठवड्यात जेईई (JEE) परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या परीक्षेच्या आयोजनामुळे MHT CET परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन राज्याच्या सीईटी सेलने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती ट्विट करुन दिली आहे. उदय सामंत यांनी ट्विटमध्ये असे म्हटलंय की, JEE आणि NEET परीक्षांच्या मुळे CET परीक्षा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होईल. परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करू असे उदय सामंत यांनी सांगितले.

- Advertisement -

जेईई मेन परीक्षा २०२२ जूनपासून होणार आहे. जेईई मेन सत्र १ ची परीक्षा २९ जूनला संपणार आहे. जेईई मेन सत्र २ ची परीक्षा ३० जुलै रोजी संपणार आहे. राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा NEET UG 20222 परीक्षा १७ जुलै २२ रोजी होणार आहे. ही प्रमुख स्पर्धा परीक्षा संपल्यानंतर महाराष्ट्र सामायिक परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आगामी २३-२४ मध्ये प्रवेशासाठी महाविद्यालयीन प्रवेश परीक्षेचा सामना करावा लागू नये.

- Advertisement -

महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट (सीईटी) सेलचे आयुक्त आरएस जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.” फक्त अभियांत्रिकी सीईटी पुढे ढकलण्यात आली आहे तर इतर सर्व सीईटी पूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात येतील. महाराष्ट्र सीईटी ११ ते २८ जून 2022 या कालावधीत होणार होती. जेईई-मेनच्या सुधारित वेळापत्रकानुसार ही परीक्षा २० ते २९ जून 2022 या कालावधीत घेतली जाईल. यापूर्वी ही परीक्षा मे महिन्यात होणार होती. त्याच वेळी, NEET 2022 जुलैमध्ये घेण्यात येईल.


हेही वाचा : Unemployment Allowance: पदवी मिळूनही नोकरी नाही, मग सरकार देणार 7500 रुपये बेरोजगारी भत्ता, पण कसा?

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -