घरताज्या घडामोडीवैयक्तिक टीका कराल तर रिॲक्शन मिळणारच, उदय सामंत यांचा नारायण राणेंना इशारा

वैयक्तिक टीका कराल तर रिॲक्शन मिळणारच, उदय सामंत यांचा नारायण राणेंना इशारा

Subscribe

नारायण राणे यांनी वैयक्तिक टीका करण्यापेक्षा जनतेचा आशीर्वाद घेतला पाहिजे - उदय सामंत

शिवसेना पक्षात आम्ही काम करत असून शिवसेनेला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माणणारे आम्ही आहोत. त्यांच्यावर टीका कोणी करु नये याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे संयम बाळगला पाहिजे. तशी टीका झाली तर त्याचे परिणाम चार दिवसांपुर्वी महाराष्ट्राने बघितलं आहे. टीका जरी झाली असली तरी संयमाने वागले पाहिजे. प्रत्येकाला आपल्या पक्षातील नेत्याबाबत सम्मान असतो. चांगल्या पद्धतीची ॲक्शन झाली तर रिॲक्शनही चांगल्या पद्धतीची मिळे असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अटक आणि सुटकेची कारवाई झाल्यानंतर राणेंनी रत्नागिरीतून पुन्हा एकदा जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. राणेंनी रत्नागिरीत यात्रा संपल्यानंतर शिवसेनेवर टीका केली आहे. यामुळे वैयक्तिक टीका कराल तर रिअॅक्शन मिळणारच असा इशारा शिवसेना नेते आणि तंत्र आणि उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. टीका झाली तरी संयमाने वागले पाहिजे. प्रत्येकाल आपल्या पक्षातील नेत्याबाबत सम्मान असतो यामुळे संयमाने वागले पाहिजे अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. जे सिंधुदूर्गात जन आशीर्वाद यात्रेसाठी येणार आहेत त्यांनी जनतेला महागाई कमी कधी होणार ते सांगावे असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे.

- Advertisement -

उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ॲक्शनला झाल्यावर रिॲक्शन मिळणार असा इशारा दिला आहे. शिवसेना पक्षात आम्ही काम करत असून शिवसेनेला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माणणारे आम्ही आहोत. त्यांच्यावर टीका कोणी करु नये याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे संयम बाळगला पाहिजे. तशी टीका झाली तर त्याचे परिणाम चार दिवसांपुर्वी महाराष्ट्राने बघितलं आहे. टीका जरी झाली असली तरी संयमाने वागले पाहिजे. प्रत्येकाला आपल्या पक्षातील नेत्याबाबत सम्मान असतो. चांगल्या पद्धतीची अॅक्शन झाली तर रिअॅक्शनही चांगल्या पद्धतीची मिळे असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

यात्रे दरम्यान त्यांनी जनतेचा आशीर्वाद घ्यावा

केंद्रीय मंत्री नारायण राणे आपल्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर टीका करत आहेत. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तम काम केलं आहे. महाराष्ट्रातील कामाचा देशाने आदर्श घेतला आहे. सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात आलं आहे. यामुळे नारायण राणे यांनी वैयक्तिक टीका करण्यापेक्षा जनतेचा आशीर्वाद घेतला पाहिजे. इंधन, गॅसचे दर कधी कमी होणार हे नारायण राणेंनी जनतेला सांगितले पाहिजे. राज्याला जीएसटीचा परतावा कधी मिळणार याबाबत सांगितले पाहिजे. असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : नेत्यांनी बोलताना पथ्य पाळावीत, गिरीश बापट यांचा नारायण राणेंना घरचा आहेर


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -