Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पवारांनी मराठा आरक्षणावर तोडगा काढावा, अन्यथा उद्रेक होईल; उदयनराजेंचा इशारा

पवारांनी मराठा आरक्षणावर तोडगा काढावा, अन्यथा उद्रेक होईल; उदयनराजेंचा इशारा

उदयनराजेंनी घेतली शरद पवारांची ६ जनपथ या निवासस्थानी भेट

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडी तयार करण्यात शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यामुळे राज्य सरकारला सांगून मराठा आरक्षणावर तोडगा काढणे हे देखील शरद पावरांचे काम आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवारांनी लक्ष घातले पाहिजे. अन्यथा राज्यात उद्रेक होईल, असं भाजप खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणबाबत राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी उदयनराजे यांनी केली. यावेळी आरक्षणाबाबत वकिलांकडून कोर्टात योग्य मांडणी झाली नाही, असं देखील उदयनराजे म्हणाले. दरम्यान, उदयनराजे यांनी शरद पवारांना पत्र दिलं आहे. यामध्ये त्यांनी काही सूचना केल्या आहेत. पवारांच्या भेटीनंतर उदयनराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पवारांना भेटलात मोदींना भेटणार का? या प्रश्नावर मात्र हा विषय राजकारणाचा नाही असं म्हणत बगल दिली.

- Advertisement -

उदयनराजे यांनी आज ६ जनपथ येथे शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये १५ मिनिटं चर्चा झाली. या भेटीदरम्यान उदयनराजेंनी शरद पवारांना पत्र दिलं. या पत्रामध्ये अनेक प्रश्न आहेत त्यांची उत्तरं शरद पवारांकडे मागितली आहेत. १) जर SEBC उमेदवाराने EWS कोट्यातून आरक्षण स्वीकारलं तर त्याचा सर्वोच्च न्यायालयातल्या केसवर परिणाम होईल का?, २) SEBC वर्गातल्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर EWS आरक्षण स्वीकारलं तर त्याचा SEBCच्या केसवर परिणाम होईल का? ३) जर EWS आरक्षण माननीय सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवलं तर त्याचा ज्यांनी EWS आरक्षण स्वीकारलं आहे अशा SEBC उमेदवारांनावर काही परिणाम होईल का? असे प्रश्न उदयनराजे यांनी पवारांना विचारले आहेत. “साहेब…आपण वडीलधारे आहात, जाणकार आणि अनुभवी आहात म्हणून मी आज तुम्हाला वडीलकीच्या नात्याने ही विचारणा करत आहे. कारण आज मराठा तरुण-तरुणी मला विचारणा करत आहेत. मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर मी सुद्धा आताच त्या तरुण-तरुणींना उत्तरं देऊ शकेन,” असं उदयनराजेंनी पत्रात म्हटलं आहे.

Image

- Advertisement -

याशिवाय, महाराष्ट्र शासनाच्या मंत्रीमंडळ कमिटीने सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यासंबंधी जे जे निर्णय घेतले ते समाजासमोर आले पाहिजे. जेणेकरुन या खटल्यात सरकारकडून नेमके काय निर्देश दिले गेले याचाही खुलासा होईल, असं उदयनराजेंनी पत्रात म्हटलं आहे. राज्य सरकारला सक्त सूचना देऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. तसंच मराठा आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढण्याच्या राज्य सरकारला सूचना द्याव्यात, असं उदयनराजेंनी पवारांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

 

- Advertisement -