घरताज्या घडामोडीआम्ही आश्वासनं देत नाही, तर दिलेला शब्द पाळतो, उदयनराजे भोसलेंचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला

आम्ही आश्वासनं देत नाही, तर दिलेला शब्द पाळतो, उदयनराजे भोसलेंचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला

Subscribe

आगामी निवडणुकांमध्ये नगरविकास आघाडीची सत्ता कायम ठेवण्यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.

आम्ही फक्त आश्वासने देत नाही तर दिलेला शब्द पाळतो असा टोला भाजप नेते आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना लगावला आहे. सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राजे आमने-सामने आल्याचे दिसत आहे. नगरपालिका निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पथदिवे शुभारंभ कार्यक्रमादरम्यान स्पष्ट केलं आहे. साताऱ्यातील विकासकामांचे लोकार्पण उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उदयानराजेंनी नगरविकास आघाडीच्या कामांबाबत माहिती दिली आहे. तर आगामी निवडणुकांमध्ये नगरविकास आघाडीची सत्ता कायम ठेवण्यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील विकासकामांचे लोकार्पण करण्यासाठी एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात संवाद साधताना सातारा नगरविकास आघाडीच्या कामांची माहिती दिली आहे. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना खोचक टोला लगावला आहे. “आम्ही केवळ आश्वासने देत नाही.. आम्ही फक्त शब्द देतो आणि पाळतो या मला वाटत या संपुर्ण महाराष्ट्रात एकमेव अशी सातारा विकास आघाडी आहे की, जीने केलेल्या कामच जाहीरपणे ऑडिटचे बोर्ड लावले होते” असे उदयनराजे यांनी म्हटलं आहे. दिलेला शब्द पाळतो असे म्हणत राजेंनी शिवेंद्रसिंहराजे यांना खोचक टोला लगावला आहे. नगरविकास आघाडी स्वतंत्र निवडणुक लढवणार असल्याचे उदयनराजे यांनी स्पष्ट केल्याने दोन्ही राजेंचे मनोमीलन होणार नसल्याचे चिन्ह दिसत आहे.

- Advertisement -

साताऱ्यात उदयनराजेंची सत्ता

साताना नगरपालिकेची निवडणूक अतीतटीची असते. या निवडणुकीमध्ये दोन्ही राजे आमने-सामने असतात. २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी संपुर्ण सातारा ढवळून काढला होता. यावेळी सातारा विकास आघाडीकडून नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली होती. माधवी कदम यांना सातारा विकास आघाडीकडून संधी देण्यात आली होती. तर शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगरविकास आघाडीकडून वेदांतिराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये माधवी कदम विजय झाला होता.


हेही वाचा :  Petroleum Prices: पेट्रोल-डिझेलचे दर घटण्याची शक्यता; १७ सप्टेंबरला GST काउंसिलची बैठक

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -