Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र उदयनराजे हरणार, खडूने घराच्या भिंतीवर लिहा !

उदयनराजे हरणार, खडूने घराच्या भिंतीवर लिहा !

Subscribe

रात्री घरी जाताना एक खडू घेऊन जा आणि आपल्या घरातील भिंतीवर धनुष्यबाणाचे चिन्ह काढा आणि त्याच्याखाली लिहा ‘उदयनराजे हरू शकतात, मी त्यांना हरवणारच’ मग बघा कशी एनर्जी येते, असा सल्ला राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

भिंतीवर पुसल्या जाणार्‍या खडूने ‘उदयनराजे हरू शकतात, मी त्यांना हरवणारचे’ असे लिहायचे आणि रोज घरातून बाहेर पडताना भाजप आणि शिवसेनेचा बॅच खिशाला लावूनच घराबाहेर पडायचे, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी खास उपाय उदयनराजेंना पाडण्यासाठी कार्यकर्त्यांना सांगितला.महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी सातार्‍यातील वाई येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही टोला लगावला. शेवटच्या दिवशी शरद पवार बारामतीत सभा घ्यायचे आता तेच शरद पवार आपल्या पोरीसाठी मतदारसंघात चार-चार सभा घेत आहेत, असे ते म्हणाले. सातारा मतदारसंघातून शिवसेनेकडून माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना उदयनराजे यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे.

- Advertisement -

नरेंद्र पाटील माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र आहेत. राज्य सरकारने यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकासमंडळाचे अध्यक्षपद दिल्यानंतर नरेंद्र पाटील राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला होता.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -