Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी पुर्वनियोजित भेटीगाठी संपल्यावर आम्ही भेटणार, सांभाजीराजेंच्या भेटीबाबत उदयनराजेंचं विधान

पुर्वनियोजित भेटीगाठी संपल्यावर आम्ही भेटणार, सांभाजीराजेंच्या भेटीबाबत उदयनराजेंचं विधान

संभाजीराजे छत्रपती माझे बंधू आहेत. तुमचं घर आहे तुम्हीही कधीही येऊ शकता

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजातील गरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी संभाजीराजेंनी आता राज्यात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. १६ जूनपासून मोर्चा काढण्यस सुरुवात करण्यात येणार आहे. त्यापुर्वी संभाजीराजे छत्रपती साताऱ्यात उदयनराजे भोसले यांची भेट घेणार आहेत. या भेटीबाबत राज्यात चर्चा सुरु आहे. परंतु काही पुर्वनियोजित भेटीगाठी असल्यामुळे दोन्ही राजेंमधील भेट लांबणीवर गेली आहे. परंतु येत्या ३ ते ४ दिवसांत संभाजीराजे आणि उदयनराजे यांची भेट होणार आहे. अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी दोन्ही राजे एकत्र येणार आहे. संभाजीराजे यांनी सर्व मराठा समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले होते. तसेच उदयनराजेंना भेटणार असल्याचे सांगितले होते. उदयनराजे यांची पुर्वनियोजित भेट असल्यामुळे काही दिवसांनी भेट होणार असल्याची माहिती उदयनराजे यांनी दिली आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांची भेट लांबणीवर गेली आहे. याबाबत उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी उदयनराजे भोसले यांनी म्हटलं की, माझ्या अगोदरच काही भेटीगाठी ठरल्या होत्या. नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांसोबत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठीची आज महत्त्वाची बैठक आहे. तसेच पुर्वनियोजित भेटी असल्यामुळे आमची भेट होऊ शकणार नसल्याचे उदयनराजे यांनी म्हटले आहे.

दरम्यान उदयनराजे यांनी पुढे म्हटले आहे की, संभाजीराजे छत्रपती माझे बंधू आहेत. तुमचं घर आहे तुम्हीही कधीही येऊ शकता असं त्यांना सांगितलं आहे. तसेच त्यांच्या प्रत्येक कार्यात मी त्यांच्यासोबत आहे. आम्ही भेटणार आहे फक्त दोन ते तीन दिवसांतील पुर्वनियोजित भेटीगाठी संपल्या की आम्ही भेटू आणि त्यावेळी चर्चेमध्ये काहीतरी चांगले घडेल असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

१६ जूनला कोल्हापुरात मुकमोर्चा – संभाजीराजे

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. १६ जून रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरात मूक आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाल मराठा समाजाचे समन्वयक, मराठा समाज,लोकप्रतिनीधी आणि अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. ३६ जिल्ह्यांत मराठा आंदोलन करण्यता येणार आहे. यानंतरही सरकारला जाग आली नाही तर मराठा समाज पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढणार असल्याचा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.

- Advertisement -