घर महाराष्ट्र Udayanidhi Stalin : उद्धव ठाकरेंची हिम्मत आहे का? सनातनच्या वादावरून नितेश राणेंचे...

Udayanidhi Stalin : उद्धव ठाकरेंची हिम्मत आहे का? सनातनच्या वादावरून नितेश राणेंचे आव्हान

Subscribe

मुंबई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (Tamil Nadu Chief Minister MK Stalin) यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी शनिवारी सनातन धर्मावर वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. यावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले आहे.

- Advertisement -

सनातन धर्माबद्दल उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आमदार नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. ब्रिटिश राजवट औरंगजेब व मुघल यांना सनातन धर्म संपविता आला नाही. द्रमुक आणि त्यांच्या इंडिया आघाडीला सुद्धा ते शक्य होणार नाही. आपले सर्व पूर्वज हिंदू होते, हेही उदयनिधी स्टॅलिन विसरले. जो आपल्या धर्माचा झाला नाही, तो आपल्या राज्याचा आणि देशाचा काय होणार? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

हेही वाचा – ‘भाजपला 25 आमदार निवडून देण्यात माझं योगदान’; पंकजा मुंडेंचा दावा

- Advertisement -

आपण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र असल्याचे जे सांगत फिरतात, ते उद्धव ठाकरे या सनातन धर्मावरील आक्रमणाबाबत बोलण्याची हिम्मत दाखवणार का? का गप्प बसला आहात? हिंदुत्वाची प्रमाणपत्रे सर्वांना देत फिरता, मग उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात बोलण्याची हिम्मत दाखवा, असे आव्हान त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

हेही वाचा – ज्यांनी लाठीचार्जचे आदेश दिले त्यांना मराठवाडा बंदी करा; राज ठाकरेंचे आंदोलकांना आवाहन

काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन?

चेन्नईतील एका संमेलनात उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. सनातन ही कल्पना मूळतः प्रतिगामी आहे. जात आणि लिंगाच्या आधारावर लोकांना विभाजित करते आणि मूलभूतपणे समानता आणि सामाजिक न्यायाला विरोध करते. सनातन धर्म हा सामाजिक न्यायाच्या कल्पनेच्या विरोधात असून तो रद्द केला पाहिजे. सनातन धर्म हा मलेरिया आणि डेंग्यूसारखाच आहे, त्यामुळे त्याचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे, असे मत त्यांनी मांडले होते. स्टॅलिन यांच्या वक्तव्याचे सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटत असून अनेक युजर्सनी तामिळनाडूच्या मंत्र्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -