HomeमनोरंजनUdayanraje Bhosale : छावा चित्रपटातील 'त्या' सीनबाबत उदयनराजेंचा थेट दिग्दर्शकाला फोन; म्हणाले,...

Udayanraje Bhosale : छावा चित्रपटातील ‘त्या’ सीनबाबत उदयनराजेंचा थेट दिग्दर्शकाला फोन; म्हणाले, एका दृष्यात…

Subscribe

Chhaava Movie Controversy : छावा चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजीराजे लेझीमवर नाचताना दिसत आहेत. यावरून नवा सुरू असताना उदयनराजेंनी दिग्दर्शनकाला फोन केला आहे.

सातारा : छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित ‘छावा’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजीराजे हे एका दृष्यात नृत्य करताना दिसत आहेत. या दृश्याबाबत इतिहासतज्ज्ञांशी चर्चा करून वादग्रस्त दृश्य काढून टाकावे, अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना केल्या. यानंतर इतिहासतज्ज्ञांशी चर्चा करुन दृश्यात्मक रचना चित्रपटात बदल करू, असं आश्वासन लक्ष्मण उतेकर यांनी दिलं.

‘छावा’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल आणि महाराणी येसुबाई यांची भूमिका रश्मिका मंदाना यांनी केली आहे. या चित्रपटात लेझीम खेळ प्रकारावर छत्रपती संभाजी महाराज नृत्य करताना दाखवण्यात आले आहेत. यानंतर मराठा क्रांती मोर्चासह अनेक संघटनांनी टीका करत चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा दिला होता. याप्रकरणी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

हेही वाचा : काळ सोकावायला नको म्हणून….

उदयनराजे म्हणाले, “चित्रपट अत्यंत सुंदर झाला आहे. मात्र संबंधित दृश्याबाबत आपण इतिहास तज्ज्ञांशी चर्चा करावी. सातार्‍यातील राजघराण्याला आणि छत्रपती शिवरायांना संपूर्ण भारत विशेष: महाराष्ट्रातील लोक देवस्थानी मानतात. त्यामुळे त्यांच्या भावना तीव्र असतात. या भावना जपल्या जाव्यात म्हणून या दृश्याबाबत आपण पुन्हा विचार करून वादग्रस्त दृश्ये काढून टाकावीत.”

“आयुष्यात पुढे वाटचाल करताना आपला इतिहास विसरून चालणार नाही. इतिहास आपला शिक्षक आहे. त्यातून आपल्याला खूप शिकायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. आजच्या तरूणाईला आपला इतिहास समजणे फार गरजेचे आहे. हा चित्रपट प्रदर्शित होणे तरूणांसाठी महत्त्वाचे आहे. इतिहासावर फार कुणी लक्ष देत नाही. त्यामुळे हा इतिहास पुढील पिढीला कळायला हवा,” असं उदयराजेंनी उतेकर यांना म्हटलं.

यावर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर म्हणाले, “छावा चित्रपटाचा प्रत्येक सीन अभ्यासपूर्ण चित्रित करण्यात आला आहे. तरीही संबंधित दृश्याबाबत नक्कीच इतिहास तज्ज्ञांशी चर्चा करु आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे चारित्र्य पुढील पिढीला प्रेरणा देणारे कसे राहील अशीच दृश्यात्मक रचना चित्रपटात करु.”

हेही वाचा : लॉस एंजेलिसचा वणवा म्हणजे एक इशारा !