घरताज्या घडामोडीराजे आले, पण कुणी नाही स्वागत केले ...

राजे आले, पण कुणी नाही स्वागत केले …

Subscribe

भाजपकडून राज्यसभा खासदारकीची उमेदवारी मिळालेले उदयनराजे आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास विधानभवनात दाखल झाले खरे, पण त्यांच्या स्वागताला भाजपातला एकही कार्यकर्ता किंवा आमदार न यावे यासारखा अनुभव त्यांना आला. राज्यसभेवर खासदारकीसाठी देण्याची घोषणा महाराष्ट्र भाजपकडून करण्यात आली. खासदारकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज उदयनराजे विधानभवनात पोहचले होते. पण विधानभवनात उदयनराजे एकटे पडल्याचेच चित्र होते. एरव्ही कार्यकर्त्यांच्या गराड्यासह दिसणारे उदयराजे आज मात्र एकटेच विधानभवनाच्या व्हीआयपी गेटवरून आत आले. आतमध्येही आल्यानंतरही भाजपचा एकही पदाधिकारी किंवा एकही आमदार त्यांच्या सोबत दिसला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशीच महाराजांचे वंशज असलेल्या उदयनराजे भोसले यांचे भाजपकडून अशा प्रकारे थंड स्वागत झाले.

येत्या २६ मार्च रोजी होणार्‍या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी उमेदवार यादी जाहीर केली. त्यात मित्र पक्षांच्या दोन उमेदवारांसह एकूण ११ जणांची नावे आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांचेही नाव त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. एकूण नऊ राज्यांमधील राज्यसभा उमेदवारांची नावे यात जाहीर करण्यात आली आहे. आज दुपारी उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मात्र विधानभवना बाहेरील फोटो सेशनसाठी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, रामदास आठवले, प्रवीण दरेकर आदी भाजप नेते हजर होते.

- Advertisement -

अशी आहे नावांची यादी

असाम (भुवनेश्वर कालीता), बिहार (विवेक ठाकूर), गुजरात (अभय भारद्वाज, रमीलाबेन बारा), झारखंड (दीपक प्रकाश), मणिपूर (लिएसेंबा महाराजा), मध्य प्रदेश (ज्योतिरादित्य शिंदे, हर्ष सिंह चौहान), महाराष्ट्रातून (उदयनराजे भोसले, रामदास आठवले), राजस्थान (राजेंद्र गहलोत) यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -