घरताज्या घडामोडी'...तेव्हा दोघांच्या कामातला फरक दिसेल'; दीपक केसरकर यांची नाव न घेता ठाकरेंवर...

‘…तेव्हा दोघांच्या कामातला फरक दिसेल’; दीपक केसरकर यांची नाव न घेता ठाकरेंवर टीका

Subscribe

शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी खासदार उदयनराजे यांची भेट आणि माजी खासदार संभाजीराजे यांचीही भेट घेतली. 'उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी मला पर्यटन स्थळांबाबत मार्गदर्शन केले आहे. मी पर्यटन मंत्री होवो किंवा न होवो. पण आपल्या गौरवशाली इतिहास जगासमोर आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे', असे भेटीनंतर दीपक केसरकर यांनी म्हटले.

शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी खासदार उदयनराजे यांची भेट आणि माजी खासदार संभाजीराजे यांचीही भेट घेतली. ‘उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी मला पर्यटन स्थळांबाबत मार्गदर्शन केले आहे. मी पर्यटन मंत्री होवो किंवा न होवो. पण आपल्या गौरवशाली इतिहास जगासमोर आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे’, असे भेटीनंतर दीपक केसरकर यांनी म्हटले. तसेच, ‘दीपक केसरकर यांना पर्यटनमंत्री व्हावे, असा आमचा आग्रह आहे’, असे संभाजीराजे यांनी म्हटले. याशिवाय, ‘पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी अडीच वर्षे काम केले. आता उरलेल्या अडीच वर्षांत नवा पर्यटन मंत्री जे काम करून दाखवेल, तेव्हा दोघांच्या कामातला फरक दिसेल’, असे म्हणत दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. (udayanraje bhosale sambhajjraje deepak kesarkar tourism minister aaditya thackeray)

राज्याचे मंत्री दीपक केसरकर आणि माजी खासदार संभाजीराजे यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद झाली. त्यावेळी “छत्रपती शिवाज महाराज आणि छत्रपती शाहु महाराज यांचा महाराष्ट्रात सर्वाधिक अभिमाल बाळगला जातो. सामाजिक क्रांती या भूमी शाहु महाराजांनी घडवली. महाराष्ट्राचे वैभव जगासमोर आले पाहिजे. शिवाय, जयपूर आणि कोल्हापूरमध्ये काहीच फरक नाही. तिकडे पिंक स्टोन आहे, इकडे ब्लॅक स्टोन आहे. त्यामुळे आपण हे जगासमोर आणू शकलो नाही. तर आपण आपला इतिहास विसरल्यासारखे होईल. जगातील सर्वाधिक लोक फ्रान्समध्ये जातात. फ्रान्सने आपले वैभव जपलेले आहे”, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.

- Advertisement -

“पर्यटन मंत्री म्हणून त्यांनी अडीच वर्षे काम केले. आता उरलेल्या अडीच वर्षांत नवा पर्यटन मंत्री जे काम करून दाखवेल, तेव्हा दोघांच्या कामातला फरक दिसेल. त्यानंतर त्यांना महाराष्ट्रात फिरण्याचा अधिकार राहणार नाही. आमच्यावर टीका करण्यापूर्वी तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केले याचा आधी विचार करावा. महाराष्ट्राचे वैभव घडवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू. नुसते बोलून नाही तर, काम करून दाखवू आणि महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास जपू. मी पर्यटन मंत्री होवो किंवा न होवो, पण येत्या काळाता जे पर्यटन मंत्री होतील त्यांना मी महाराष्ट्राचा इतिहासा जगासमोर आणण्यासाठी मागणी करीन. त्यावेळी मी छत्रपती संभाजी राजे यांच्यासोबत जाईन”, अशा शब्दांत दीपक केसरकर यांनी नाव न घेता माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला हाणला. त्यामुळे आता दीपक केसरकर यांच्या टीकेला शिवसेनेकडून काय उत्तर दिले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

“राज्यात झालेले मराठा आंदोलन पेटणार होते. पण त्यावेळी संभाजीराजेंच्या एका शब्दांवर मराठा आरक्षण आंदोलन मागे घेतले होते. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लवकरच बैठक घेणार आहे”, असेही केसरकर यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष; मुंबईची जबाबदारी आशीष शेलार यांच्याकडे

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -