Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा, होऊ जाऊ देत ‘दूध का दूध, पानी का...

मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा, होऊ जाऊ देत ‘दूध का दूध, पानी का पानी’ – उदयनराजे भोसले

Related Story

- Advertisement -

छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसवर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. उदयनराजे यांनी सोहळ्याआधी देवीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात केली. मग छत्रपती उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका राज्य सरकारने लवकरात लवकर जाहीर करावी. आता मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा आणि दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ देत.’

नक्की काय म्हणाले उदयनराजे भोसले?

‘मराठा आरक्षणा प्रश्नी आंदोलन करण्याची वेळ यायला नव्हती पाहिजे. आंदोलन कधी होते, जेव्हा अन्याय होतो. अॅक्शनला रिक्शन असणारच कारण नसताना आंदोलन वैगेरे करण्यापेक्षा आता अहवाल आला आहे, याविषयावर अधिवेशन भरावा. याचे लाईव्ह टेलिकास्ट केले पाहिजे. नेमकं चाललंय ते लोकांना कळू द्या. माध्यमासमोर काही वेगळं बोलायचं आणि करायचं मात्र त्याच्या विरुद्ध, हा ढोंगीपणा आहे. हे फार काळ टिकणार नाही. प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे, आपाल्याला दोन डोळे आहेत. पण समाजातील सर्व डोळे आपाल्याकडे आहेत. जर उद्रेक झाला तर याला जबाबदार फक्त आणि फक्त राज्यकर्ते असणार आहेत. कारण नसताना कोणीही टोलवाटोलवी करण्याचे नाही
पक्ष कुठला जरी असला तरी अधिवेशन बोलवा. दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ देत. लोकांना कळू द्या, आपण निवडून दिलेले प्रतिनिधी नेमके काय काम करत आहेत. आपल्याला एकत्र करण्याचे काम करतात की तोडातोडीचे काम करतात. मूळ मुद्दा राहतो बाजूला आणि यांना यांच्या राजकारणाची पडली आहे,’ असे उदयनराजे भोसले म्हणाले.


- Advertisement -

हेही वाचा – राज्याभिषेक सोहळा ऐकताना, त्याबद्दल लिहिताना अंगावर काटा उभा राहतो – जयंत पाटील


 

- Advertisement -