Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मोदी मन की बात करत होते मात्र त्यांच्या मनात धन की बात...

मोदी मन की बात करत होते मात्र त्यांच्या मनात धन की बात होती – उदयनराजे

Subscribe

पार्थ पवार आज उमेदवार असला तरी तो लवकर माझ्याबरोबर खासदार म्हणून असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

‘गेल्या पाच वर्ष्यात केवळ ‘मन की बात’ झाली. एवढा अभिनय तर मी कधी पाहायला नव्हता, अशी टीका उदयनराजे यांनी केली आहे. ‘अभिनय करून लोकांपर्यंत पोहचलात खरं. तरुणांना दोन कोटी नोकऱ्या देतो, बँक खात्यात १५ लाख रुपये देतो अशी आश्वासन दिले गेली. नागरिकांचं काय चुकलं नागरिकांनी विश्वास ठेवला त्यांना निवडून दिले ही चूक झाली का? वाटलं आपण फार हुशार झालोत. अशा फसव्या घोषणा करून या सरकारने नागरिकांचा केसांनी गळा कापला’, असल्याची टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपा सरकारवर केली आहे. दरम्यान, पार्थ पवार आज उमेदवार असला तरी तो लवकर माझ्याबरोबर खासदार म्हणून असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या जाहीर प्रचार सभेत बोलत होते.

मोदींचे खायचे दात वेगळे

खासदार उदयनराजे म्हणाले, ‘देशाच्या स्वातंत्र्यसाठी कोणाचा भाऊ, वडील शहीद झाले. मात्र गेल्या पाच वर्ष्यात या देशाची बिकट अवस्था या सरकारने केली आहे. यांना केवळ तुमचं मत हवंय तुमच्या विचारांची किंमत यांनी ठेवली नाही. भाजपा सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसून ते आश्वासन विसरले आहेत. मोदी हे सांगताना मन की बात करत होते, मात्र त्यांच्या मनात धन की बात होती. आपल्यापर्यंत केवळ मन की बात पोहचत होती. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, अशी टीका उदयनराजे यांनी केली आहे.

मी तुमची रक्षा करणारा मिलीटरी पोलीस आहे

- Advertisement -

‘निळूफुले यांच्या तालमीत तयार झालेलो आहे. यांना धडा शिकवण्यासाठी तुमची साथ महत्वाची आहे. दुसऱ्या नेत्यांसारख बोलणार नाही करून दाखवणार ही माझी ख्याती आहे. एम.पी म्हणजे काय? मेम्बर ऑफ पार्लमेंट पण मला लागू वेगळं होत. एम.पी म्हणजे तुमची रक्षा करणारा मिलीटरी पोलीस आहे. मूठभर लोकांचे खिसा भरण्याचे काम या सरकारने केले आहे. संपूर्ण देश आर्थिक दिवळखोरच्या उंबरठ्यावर आहे. आम्हाला निवडून दिले तर देश प्रगती करेल महासत्तेकडे वाटचाल करेल, अले उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -