उदयनराजेंनी अमित ठाकरेंना दिली ‘ही’ खास भेट अन् म्हणाले ‘तू लहान राहिला नाहीस’

udayanraje bhosle gifted bvlgari men perfume to amit thackeray

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि नेते अमित ठाकरे आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आज त्यांनी साताऱ्यातील राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी माझा मुलगा घरी आला असं वाटलं म्हणत उदयनराजे भोसलेंनी त्यांच आदरातिथ्य केलं.

अमित ठाकरेंनी सर्वप्रथम साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीस्थळी भेट दिली, त्यानंतर त्यांनी शिवतीर्थावर नतमस्तक होऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी अमित ठाकरे यांना एक खास भेट दिली आहे. उदयनराजे यांना अमित ठाकरेंना काय खास भेटी दिली असा प्रश्न जेव्हा पत्रकारांनी विचारला तेव्हा अमित ठाकरे चांगलेच लाजले. तर यावर उदयनराजेंनी दिलेल्या उत्तराने तर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

यावेळी माध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले की, अमित घरी आला तो माझा मुलगा घरी आल्यासारखा वाटला, अमितसारख्या तरुण नेत्यांनी पुढे आलं पाहिजे आणि लोकांची त्यांच्या माध्यमातून सेवा झाली पाहिजे, ठाकरे घराण्याच्या इतिहास मोठा आहे. प्रबोधकार ठाकरेंपासून बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांचे नाव अमित ठाकरेंनी लौकीक केलं पाहिजे, अमित ठाकरेंचा फॅन फॉलोईंग जोरात आहे, असं म्हणत अमित येणार म्हटल्यावर मला केसांना क्लब करायचा होता, पण ते राहिलं, अशी मिश्किल टिप्पणीही उदयनराजेंनी केली. तसंच उदयनराजेंनी अमित ठाकरे यांच्या हातून खूप मोठं काम व्हावं‌ अशा शुभेच्छा दिल्या.

या भेटीतील एक विशेष गोष्ट म्हणजे उदयनराजेंनी अमित ठाकरेंना एक खास परफ्युम भेट दिला आहे. आणि हा परफ्युम भेट देण्यामागील कारणही त्यांनी सांगितलं आहे. ‘Bvlgari men हा परफ्युम खासदार उदयनराजे यांनी अमित ठाकरे यांना भेट दिला. यावरच उदयनराजे म्हणाले की, ‘तू लहान राहिला नाहीस, ते आता मोठ्या माणसासारखं वागणार असून आमच्या सगळ्यांची काळजी घेतली पाहिजेस म्हणून हा परफ्युम दिला आहे. यावेळी उपस्थितांनाही कारण ऐकूण हसू आवरणं अवघड झालं. यावेळी अमित ठाकरेंही शेजारीच होते, तेही चक्क कारण ऐकूण लाजले.


काही सांगण्यासारखं नाही म्हणून ईडी सरकारकडून रिवाइंड, प्ले काम; सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र