भाजपचा आक्रोश मोर्चा औरंगाबादकरांच्या पाण्यासाठी नाही तर सत्तेसाठी, मुख्यमंत्र्यांचे फडणवीसांवर टीकास्त्र

udddhav thackeray slam devendra fadnavis over protest over water crisis aurangabad

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेतून भाजपच्या जन आक्रोश मोर्चासह अनेक मुद्द्यावरून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी विरोधकांनी जल आक्रोश मोर्चा काढला होता, तो आक्रोश मोर्चा संभाजीनगरच्या पाण्यासाठी नव्हता तर सत्ता गेल्याचा आक्रोश मोर्चा असल्याचे टीकास्त्र मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर डागलं आहे.

“हिंदुत्व आपला श्वास ह्याच मैदानात शिवसेनाप्रमुख बोलले. पहिल्यांदा पाणी प्रश्नावर बोलणार कुठेही फसवेगिरी नाही. हा प्रश्न बिकट होता. आता सुधारणा झाली की नाही? जुनी योजना हातात दंडा घ्या आणि पहिले संभाजीनगरला पाणी द्या. जुन्या योजनेसाठी समांतर योजनेला पैसे देणार आहे.. कोरोनात वर्ष गेली. पण आता किंमती वाढल्या खर्च वाढणार पण शासनाने याची जबाबदारी घेतली. कंत्राटदार अडून बसला तर सरळ तुरूंगात टाका. काल सुध्दा वाईल्ड लाईफ बोर्डाची बैठक घेतले हे तुमच्या सरकारने घेतले. मध्ये कुणीतरी आक्रोश मोर्चा काढला.. तो मोर्चा आक्रोश मोर्चा सत्ता गेली म्हणून होता पाण्यासाठी नाही.” अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांच्या जन आक्रोश मोर्चाचा समाचार घेतला.

“तसेच मागचे पाच वर्षे तुम्हीच होता. तुम्ही किती पैसे दिले तेव्हा? आम्ही फक्त त्यांच्यासोबत होतो. खोटं बोलणं हे आम्हाला शिकवलेलं नाही. रस्त्यासाठी आम्ही निधी दिला आहे. तीन चार वर्षापूर्वी संभाजीनगरचे रस्ते कसे होते. अजूनही पूर्ण काम झालेलं नाही. पण सुधारणा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केला. अगदी मेट्रोची गरज लागली तर त्यासाठी प्लान बनवण्याची सुरुवात केली आहे. मेट्रो शहराची विद्रुपीकरण करणारी नसेल. विध्वसंक विकासकाम आम्ही केलेलं नाही आणि होऊ देणार नाही. संभाजीनगरची शान जाईल असं मी काही करणार नाही,” असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत.

“संभाजी महाराजांच्या नावाला सार्थ असं शहर बनवेन त्यावेळी मी शहराचं नाव बदलेनं. संभाजी राजांच्या नावाला साजेसं शहर बनवेन. मात्र, पाणी नाही, रस्त्यात खड्डे आहेत, अशा वेळी शहराला नाव देणार नाही. संभाजी राजांच्या नावाला सार्थ असं शहर करेन आणि नाव देण्यासाठी जे करायला लागेल ते करेन,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.


बाळासाहेबांनी दिलेलं वचन मी पूर्ण करणार, नामांतरणावरून मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादकरांना दिला विश्वास