शिवसेना आणि राष्ट्रवादीत एक वर्षाच्या अंतरानं फूट पडली. दोन्ही पक्ष, चिन्ह एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना मिळालं. त्यामुळे दोन राष्ट्रवादी आणि दोन शिवसेना लोकसभेला सामोरे गेले होते. यात ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांनी चांगला ‘परफॉरमन्स’ केला होता. मात्र, आता विधानसभेला शिंदे आणि अजितदादांनी चांगली कामगिरी केली आहे.
विधानसभेला ठाकरेंची विरुद्ध शिंदेंची शिवसेना 51 ठिकाणी, तर शरद पवार आणि अजितदादांची राष्ट्रवादी 40 ठिकाणी समोरा-समोर आले होते. ‘गद्दार’ असा शिक्का लागलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचे काय होणार? शरद पवार की अजितदादांची राष्ट्रवादी पसंतीला उतरणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
हेही वाचा : “बारामती लढली नसती, तर वेगळा संदेश गेला असता”, शरद पवारांच्या विधानावर अजितदादा म्हणाले, “माझ्या भावाच्या…”
ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेची 51 ठिकाणी थेट लढत झाली होती. यात ठाकरेंच्या शिवसेनेचे 14 आमदार शिंदे गटाच्या उमेदवारांशी लढून निवडून आले. तर, शिंदेंच्या शिवसेनेचे 36 आमदार ठाकरेंच्या शिवसेनेशी फाइट करून निवडून आले आहेत.
दुसरीकडे शरद पवार आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 40 ठिकाणी उमेदवार आमने-सामने लढत होते. यात फक्त 7 ठिकाणी शरद पवार यांच्या पक्षाच्या आमदारांनी अजितदादांच्या उमेदवारांना चितपट केले आहे.
कुणाला मिळाल्या किती जागा?
- शिवसेना ( ठाकरे गट ) : 20
- शिवसेना ( शिंदे गट ) : 57
- राष्ट्रवादी ( शरद पवार ) : 10
- राष्ट्रवादी ( अजित पवार ) : 41
हेही वाचा : “10 मिनिटांत यांना आमदार केलं, मात्र आता फडणवीसांचा हा पठ्ठ्या…”, राम सातपुतेंचा रणजितदादांना इशारा