ठाकरे गटाला लागलेली गळती थांबेना; 8 राज्यांतील शिवसेनेच्या बड्या नेत्यांचे शिंदेंना समर्थन?

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फुट पडली. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी शिंदे गटात सहभाग घेतला. त्यानंतर राज्यात भाजपासोबत युती करत सरकार स्थापन केले. त्यानंतर हळुहळू राज्याच्या कानाकोपऱ्यातून माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून बसणारे धक्के बसण्यास सुरूवात झाली.

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फुट पडली. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी शिंदे गटात सहभाग घेतला. त्यानंतर राज्यात भाजपासोबत युती करत सरकार स्थापन केले. त्यानंतर हळुहळू राज्याच्या कानाकोपऱ्यातून माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून बसणारे धक्के बसण्यास सुरूवात झाली. त्यानंतर आता दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह आठ राज्यातील शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्याचा दावा करण्यात आला.

राज्यानंतर आता महाराष्ट्राबाहेरुनही शिवसेनेला हादरे बसत आहेत. महाराष्ट्राबाहेरील 10 राज्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. यावेळी दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह 8 राज्यातील शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्याचे समजते. मात्र, हे नेते अधिकृत नसून, अधिकृत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अॅफिडेव्हिट देत आपल्यासोबत असल्याचे ठाकरेंकडून सांगितले जात आहे.

देशभरातील शिवसेनेच्या बड्या नेत्यांची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत सहभागी झालेल्या 10 पैकी 8 राज्यांतील शिवसेना प्रमुखांनी एकनाथ शिंदेंना समर्थन देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आला. दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गोवा, मणिपूर, छत्तीसगड या राज्यांचा समावेश होतो.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर 40 आमदार, 10 समर्थक विधिमंडळ सदस्य, 12 खासदार, नगरसेवक तसेच, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्या गटाला लागलेली गळती थांबतना दिसत नाही. राज्याच्या विविध भागातून शिंदे गटात प्रवेश सुरुच आहेत.

याशिवाय, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील महाविकास आघाडी सरकारने घेतलेले अनेक निर्णयांवर स्थगिती आणली. त्यामुळे शिवसैनिकांपासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून शिंदे गटावर हल्लाबोल केला जात आहे.


हेही वाचा – वेदांता प्रकल्प गुजरातला जाणे हे दुर्दैव; तळेगाव हीच योग्य जागा : शरद पवार