ठाकरे पिता- पुत्रासह संजय राऊतांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, मुंबई उच्च न्यायालयात याचिका

यावरून परिस्थिती योग्य नसून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याची केंद्र सरकारला काळजी असल्याचे स्पष्ट झाले आहे. असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे

uddhav thackeray aditya thackeray and sanjay raut should book for sedition pil in high court 6

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे राजकीय घडामोडींना कुठे तरी वेग आला आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे अशा दोन गटात सत्तासंघर्ष वाढताना दिसतोय, याच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र मंत्री आदित्य ठाकरे आणि पक्षाचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आला आहे. समाजात अशांतता निर्माण करणे आणि सरकारी कामाक अडथळा आणल्याप्रकरणी या तिन्ही नेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जनहित याचिकेत करण्यात आली आहे.

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच ठाकरे पिता-पुत्र आणि संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला देखील न्यायालयाने स्थगिती द्यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. याशिवाय एकनाथ शिंदे गटाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील विविध भागात त्यांना फिरण्यावर बंदी घालावी. अशी मागणीही याचिकेत केली आहे.

पाटील यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, बंडखोर आमदारांची सुरक्षा धोक्यात असल्याने ते गुवाहाटीला गेले आहेत. राऊत आणि ठाकरे यांच्याकडून धमक्या येत असल्याने जीव वाचवण्यासाठी ते तिथे गेले आहेत. शिवसेनेत सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे कार्यकर्ते राज्याच्या विविध भागात आंदोलन करत आहेत. लोकांच्या मनात भीती निर्माण व्हावी म्हणून हा प्रकार घडत असल्याचे ते म्हणाले. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून शिवसैनिक अनेक ठिकाणी हिंसाचार आणि दंगली करत आहेत.

हेमंत पाटील यांनी याचिकेत म्हटले आहे की, ‘राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये केवळ उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या सांगण्यावरून आंदोलने केली जात आहेत.एवढेच नाही तर समाजकंटकांकडून सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान केले जात असून पोलीस मात्र सर्व काही मूकपणे पाहत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते, अशी स्थिती राज्यातील आहे. असे काही झाल्यास ठाकरे पिता-पुत्र आणि संजय राऊत जबाबदार असतील. केंद्र सरकारने बंडखोर आमदारांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे. यावरून परिस्थिती योग्य नसून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याची केंद्र सरकारला काळजी असल्याचे स्पष्ट झाले आहे. असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.


राज्यात लवकरच पोलीस भरती, गृहमंत्र्यांची माहिती