घरमहाराष्ट्र"उद्धव ठाकरे विकासाच्या विरोधात...", देवेंद्र फडणवीसांची टीका

“उद्धव ठाकरे विकासाच्या विरोधात…”, देवेंद्र फडणवीसांची टीका

Subscribe

बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांचा विकासाच्या विरोधातील चेहरा सर्वांच्या समोर आला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

कोकणातील नाणार येथे उभा करण्यात येणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला नाणार वासीयांचा विरोध झाल्यानंतर हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव येथे उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण मागील आठवड्यात या गावातील नागरिकांनी हा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात येऊ नये, यासाठी जोरदार आंदोलन केले. पण या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. या प्रकरणाचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत आहे.

उद्या शनिवारी (ता. 06 मे) बारसू या गावातील उद्धव ठाकरे हे भेट घेणार आहेत. पण त्याचवेळी सत्ताधारी पक्षातील आमदार-खासदार देखील या प्रकल्पाच्या समर्थनात मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे बारसूमध्ये उद्या नेमके काय होणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणी होणारे राजकारण तापत असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांचा विकासाच्या विरोधातील चेहरा सर्वांच्या समोर आला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. मुंबईतील मेट्रो कारशेड हे आरे कॉलनीत होऊ नये, अशी भूमिका याआधी काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे हे विकासाच्या विरोधात असल्याचे मत व्यक्त केले होते.

- Advertisement -

हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या बारसूमधील सभेला परवानगी नाकारल्याने संजय राऊतांची सरकारवर टीका

उद्धव ठाकरेंच्याबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “यापेक्षा आणखी कोणती दुटप्पी भूमिका ही असूच शकत नाही. स्वतः आधी प्रकल्प बारसूला करा असे पत्र पाठवायचे आणि नंतर स्वतः त्याठिकाणी जाऊन चिथावणीखोर कृती करायची. मी एवढंच म्हणेल की उद्धवजींचा विकास विरोधी चेहरा हा यातून बाहेर आला आहे आणि त्याना समाजाशी काही घेणं देणं नाहीये. विकासाशी काही घेणं देणं नाहीये. निव्वळ राजकारण करायचंय. त्याकरिता वेगवेगळ्या लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवतात. आता बारसूच्या लोकांचा खांदा त्यांना मिळाला आहे,” अशी टीका फडणवीस यांच्याकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी बारसूमधील दौरा जाहीर केल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी सुद्धा बारसू रिफायनरीच्या समर्थनात मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. सत्ताधाऱ्यांच्या या मोर्च्यामध्ये राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, भाजपचे माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजप नेते प्रमोद जठार हे रिफायनरीच्या समर्थनात निघाणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत, अशी माहिती भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता हे विरोधक आणि सत्ताधारी समोरासमोर आल्यानंतर नेमके काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -