गोमूत्र शिंपडून स्वातंत्र्य मिळालेले नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

खेड य़ेथे रविवारी उद्धव ठाकरे यांची जाहिर सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, बाळासाहेबांनी भाजपला मोठे केले. आज ते शिवसेना संपवायला निघाले आहेत. हिमत असेल तर मोदींच्या नावाने मते मागवून दाखवा. बाळासाहेबांचे नाव ना घेता मते मागवून दाखवा.

रत्नागिरीः भाजपवाल्यांना वाटते की गोमूत्र शिंपडून स्वातंत्र्य मिळाले. पण स्वातंत्र्य गोमूत्र शिंपडून मिळालेले नाही. अनेक विरांच्या आहुतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात नसलेल्यांनी देशाबद्दल बोलू नये, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

खेड य़ेथे रविवारी उद्धव ठाकरे यांची जाहिर सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, बाळासाहेबांनी भाजपला मोठे केले. आज ते शिवसेना संपवायला निघाले आहेत. हिमत असेल तर मोदींच्या नावाने मते मागवून दाखवा. बाळासाहेबांचे नाव न घेता मते मागवून दाखवा. निवडणूक लढवण्याची तुमच्यात हिमत नाही. अंधेरी पोटनिवडणूक लढवण्याची ताकद तुमच्यात नाही. कसब्यातही त्यांचा पराभव झाला. त्यामुळे माझे खुले आव्हान आहे की निवडणुका घ्या. मी मशाल घेऊन येतो. बघू कोणाचा विजय होतो, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.

गुजरातमधून सरदार पटेल चोरले, बंगालमध्ये सुभाषबाबू चोरले इकडे बाळासाहेब चोरले. चोराला, या वृत्तीला मत देणार का? तुम्ही धनुष्यबाण घेऊन या मी मशाल घेऊन येतो. जनता जे ठरवेल ते मला मान्य. मी हवा की नको हे तुम्ही ठरवणार आहात. निवडणुक आयोग नाही. २०२४ स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नसलेला पक्ष गाडून टाकायचा आहे हा निश्चय करा. नाहीतर २०२४ नंतर आपल्या देशात लोकशाही शिल्लक राहणार नाही. संपूर्ण हिंदुस्थानात छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आपल्याला फडकवायचा आहे, असेही उद्धव ठाकरे यांना सांगितले.

यांच्यात अनेक असे आहेत ज्यांनी बाळासाहेबांना बघितले पण नाही. ते आम्हाला बाळासाहेबांचे विचार सांगतात. नोकरी, उद्योग बाहेर जाऊ देणे हे बाळासाहेबांचे विचार नव्हते. एक काळी टोपीवाला होता तो गेला. शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांचा त्याने अपमान केला. तरीही हे गद्दार काहीच बोलले नाहीत. हे केवळ दिल्लीची गुलामी करत आहेत. यांना त्याशिवाय काहीच जमणार नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी हाणला.

कपिल सिब्बल हे आपली बाजू मांडत आहेत. लोकशाही, स्वातंत्र्य धोक्यात आले आहे, अशी खंत सिब्बल यांनी व्यक्त केली आहे. त्याला आपण पाठिंबा द्यायला हवा, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. जर आम्हाला देशद्रोही म्हणाल तर जीभ हासडून टाकू, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला.

मी कोणी नाही : उद्धव ठाकरे

मी कोणी नाही. बाळासाहेबांचे विचार पाठिशी आहेत म्हणून मी आहे. मी सुरुवातीला सांगायचो की मी बाळासाहेबांचा मुलगा आहे. तेव्हा मला बोलायचे की काय सारखं सारखं सांगतोस की बाळासाहेबांचा मुलगा आहे. आज तुम्हा काय करत आहात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.