शिवसेना फोडायची नाही तर संपवायची आहे, उद्धव ठाकरेंचा आरोप

Cm Uddhav Thackeray

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर शिवसैनिकांसोबत बैठक पार पडली. यावेळी बैठकीत ठाकरेंनी शिवसैनिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. आता काही काळ कसोटीचा आहे. त्यामुळे यांना शिवसेना फक्त फोडायची नाही तर संपवायची आहे. त्यामुळे हे सर्व षडयंत्र रचलं जात आहे. आम्ही तर आता तुमच्याच माणसाला मुख्यमंत्री केलं आहे. ज्यांनी शिवसेना फोडली किंवा जे संपवायला निघालेत, त्यांना शिवसेना बळकवायची आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

तुम्हाला भगवा ठामपणे हातात पकडायची गरज

शिवसेना बळकवून त्याचं अस्तित्व त्यांना नकोय. मात्र, आता तुम्हाला भगवा ठामपणे हातात पकडायची गरज आहे. शिवसेना ही एकच आहे. एकच होती आणि एकच राहील. ती म्हणजे आपली शिवसेना..,असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पुरंदरचा मावळा विकला जाता कामा नये

दुसरी शिवसेना या राज्यात येऊ शकत नाही. त्यामुळे कुणीही यांच्या भ्रमाला बळी पडू नका. कारण थोडे दिवस हे लालूच दाखवण्याचं काम करतील. मात्र, त्यांना पुरंदरचा मावळा विकला जाता कामा नये आणि शरण जाता कामा नये. त्यामुळे शिवसैनिकांनी आता जोमानं कामाला लागावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, शिवसेना नक्की कोणाची शिंदे गटाची की उद्धव ठाकरेंची?, यावर मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आम्हीच खरे कट्टर शिवसैनिक आहोत, असं म्हणत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना संपवण्याचं काम हे बंडखोर नेते करत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणत आहेत. त्यामुळे आता शिवसेना विरूद्ध शिवसेना असा वाद निर्माण झाला असून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे.


हेही वाचा : टोल फ्री करण्यासाठी मुख्य सचिवांना सूचना, आषाढी एकादशीच्या नियोजनाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा