घरताज्या घडामोडी'धनुष्यबाण' कोणाकडे? ठाकरे-शिंदे गटाला 7 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रं सादर करण्याची मुदत

‘धनुष्यबाण’ कोणाकडे? ठाकरे-शिंदे गटाला 7 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रं सादर करण्याची मुदत

Subscribe

महाराष्ट्रातील शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच ‘शिवसेना नक्की कोणाची?’ हा फैसला आता निवडणूक आयोग करणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगात दोन्ही गटांना येत्या 7 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

महाराष्ट्रातील शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच ‘शिवसेना नक्की कोणाची?’ हा फैसला आता निवडणूक आयोग करणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगात दोन्ही गटांना येत्या 7 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. याशिवाय, आता अंधेरी पूर्व पोटनिवडणूकही जाहीर झाली असून, या निवडणुकीपूर्वी धनुष्यबाण या चिन्हाचा फैसला होण्याची अपेक्षा आहे. (Uddhav Thackeray and shinde group will have to submit the documents by October 7 for symbol)

न्यायालयाच्या आदेशानंतर आयोगाने शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाला 7 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. शिंदे गटाची कागदपत्रं मिळावीत, या ठाकरे गटाच्या मागणीवर शिंदे गटालाही निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. सविस्तर कागदपत्रांची यादी सादर करण्याचे आदेश आयोगाने शिंदे गटाला दिले आहेत. तर ठाकरे गटही प्राथमिक कागदपत्रे 7 ऑक्टोबरपर्यंत सादर करणार असल्याचे समजते. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हासाठी ठाकरे आणि शिंदे गटामध्ये सुरु असलेल्या लढाईसाठी 7 ऑक्टोबर ही तारीख महत्त्वाची मानली जात आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही निवडणूक आयागाने कागदपत्रे सादर करण्यासाठी 7 ऑक्टोबर ही तारीख दिली असून, आता या कागदपत्रांवर निवडणूक आयोग निर्णय देणार की निवडणूक जाहीर झाली त्या क्षणाची स्थिती लक्षात घेऊन शिवसेनेला ते चिन्ह कायम ठेवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटांमधील सत्तासंघर्षाचा पेच आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता खरी शिवसेना कोणाची आणि निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार, याचा फैसला आता निवडणूक आयोग करणार आहे.

- Advertisement -

जूनमध्ये विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 40 आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार खाली खेचले आणि भाजपासोबत नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर ‘शिवसेना नक्की कोणाची?’ हा संघर्ष सुरू झाला. आता त्यावरून निवडणूक आयोगाने 8 ऑगस्टला दुपारी 1 वाजेपर्यंत ‘शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य आपल्याकडेच आहेत,’ हे सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दोन्ही गटांना दिले होते.


हेही वाचा – दसरा मेळाव्यांसाठी गर्दी जमवण्याकरीता दोन्ही गटांकडून हजारो एसटी, खासगी बसेसचे बुकिंग

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -