घरताज्या घडामोडीUddhav Thackeray : ज्याला दाखवायचं त्याला मी वेळेत दाखवतो, मुख्यमंत्री ठाकरेंची विरोधकांच्या...

Uddhav Thackeray : ज्याला दाखवायचं त्याला मी वेळेत दाखवतो, मुख्यमंत्री ठाकरेंची विरोधकांच्या टीकेवर प्रतिक्रिया

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या टीकांचाही समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो आहे. त्यामुळे माझ्यावर होणाऱ्या टीकांना मी शांतपणे घेतो आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांची बैठक घेतली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक मानली जात आहे. मुख्यमंत्री ठाकरे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या बैठकांना प्रत्यक्षात उपस्थित राहत नाही आहेत. सर्व बैठका व्हिसीद्वारे घेत असल्यामुळे विरोधकांकडून टीका करण्यात येत आहेत. मात्र मुख्यमंत्री या टीकांवर संयमाने उत्तर देत असतात. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी घेतलेल्या बैठकीत विरोधकांवरही बाण सोडला आहे. विरोधकांच्या टीकेला मी शांतपणे घेत आहे. तुम्ही निवडणुकीसाठी तयारीला लागा अशी सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिली आहे.

शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिसीद्वारे बैठक घेतली. मंगळवारी उशीरी रात्री ही बैठक घेण्यात आली होती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत नेत्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीला २२७ शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक, आमदार आणि खासदारही उपस्थित होते. राज्य सरकारने घेतलेले हिताचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचवा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेनं घेतलेला ५०० चौ.फु मालमत्ता कराचा निर्णय जनतेपर्यंत पोहचवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना दिले आहेत.

- Advertisement -

विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या टीकांचाही समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो आहे. त्यामुळे माझ्यावर होणाऱ्या टीकांना मी शांतपणे घेतो आहे. मात्र ज्याला दाखवायचे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकांवरुन प्रतिक्रिया दिली आहे. तसेच तुम्ही आगामी निवडणुकांच्या तयारीला लागा मी वेळेतच कामाची पोहोचपावती देतो असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले आहेत. जनतेसाठी काम करा आणि जनतेपर्यंत पोहचवण्याचा संकल्प करा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जनतेला बॅनर आवडत नाहीत – आदित्य ठाकरे

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. त्यांनीही पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जनतेला मोठ-मोठे बॅनर आणि होर्डिंग्ज आवडत नाही. त्यामुळे ते लावू नका तर जी काम केली ती जनतेपर्यंत पोहोचवा ते गरजेचे असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : corona virus : महाराष्ट्रातील 13 मंत्र्यांसह 25 बडे नेते कोरोनाच्या विळख्यात, 70 आमदार कोरोना पॉझिटिव्ह

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -