घरमहाराष्ट्रखचू नका आणि जिद्दही सोडू नका; उद्धव ठाकरेंनी समर्थकांना दिला विश्वास

खचू नका आणि जिद्दही सोडू नका; उद्धव ठाकरेंनी समर्थकांना दिला विश्वास

Subscribe

शिवसेनाप्रमुखांनी पुजलेला धनुष्यबाण आजही माझ्याकडेच. १०० कौरव एकत्र आले तरी पांडव जिंकले. महाराष्ट्रातील जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयात आम्ही जिंकू अशी अपेक्षा. केंद्रीय मंत्री म्हणाले होते द्या ब्रेकींग न्यूज. आज धनुष्यबाण ओरबाडून घेतले तरी तुम्हाला मिळणार नाही. चोरी पचली तरी चोर चोरच असतो. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार. तोवर त्यांना पेढे खाऊ द्या. शिवसैनिकांनो खचून जाऊ नका. हिंमत सोडू नका, असे चोर चोरी पचवू शकणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

 

मुंबईः शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह गेलं म्हणून खच्चून जाऊ नका, जिद्द सोडू नका. चोरांना चोरी पचणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी समर्थकांना शुक्रवारी दिला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली.

- Advertisement -

ते म्हणाले, त्यांना फोटो चोरावा लागतो. चिन्ह चोरावं लागतं. त्या नार्मदांना चोरी पचणार नाही. गद्दारांना मोठं करणारी जनता माझ्या सोबत आहे. त्यांना आम्ही जड गेलो. त्यामुळेच त्यांनी पैशाच्या जोरावर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल विकत घेतला. जनतेला हे पटणारे नाही. जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.

शिवसेनाप्रमुखांनी पुजलेला धनुष्यबाण आजही माझ्याकडेच. १०० कौरव एकत्र आले तरी पांडव जिंकले. महाराष्ट्रातील जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयात आम्ही जिंकू अशी अपेक्षा. केंद्रीय मंत्री म्हणाले होते द्या ब्रेकींग न्यूज. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चिन्ह व नाव शिंदे गटाला मिळेल. हे त्यांना आधीच कसे कळाले.  आज धनुष्यबाण ओरबाडून घेतले तरी तुम्हाला मिळणार नाही. चोरी पचली तरी चोर चोरच असतो. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार. तोवर त्यांना पेढे खाऊ द्या. शिवसैनिकांनो खचून जाऊ नका. हिंमत सोडू नका, असे चोर चोरी पचवू शकणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

- Advertisement -

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांचे विचार गुलामी करण्याचे नाहीत. आम्ही पोटनिवडणुक जिंकलो. महाराष्ट्रात मोदी नाव चालत नाही. आता बाळासाहेब चोरले. तुम्ही पोटनिवडणूक का नाही लढले. लोकशाही सक्षम व्हावी तर सर्वच क्षेत्रांनी एकत्र यायलाच हवे. आज माध्यमांवर पण धाडी पडताहेत. महाराष्ट्रात आज दोन पोटनिवडणुका सुरु आहेत तेव्हाच निवडणुक आयोगाने निकाल दिला. ते म्हणतात काँग्रेसने तेव्हा तसेच केले, पण म्हणूनच लोकांनी तुम्हाला निवडून दिले. देशाचे न्यायालय ही शेवटची आशा आहे.

शिवसेना आता जोमाने पुढे येणारच. अंधेरी पोटनिवडणुक झाली तेव्हा पण धनुष्यबाण नव्हते पण अगोदरपेक्षा आम्हाला अधिक मते मिळाली. उद्या कदाचित आम्हाला दिलेली मशाल पण काढून घेतील. ह्याची नोंद ठेवा. लोकशाही संपतांना आपण गुपचूप बसणार आहोत का?. आणीबाणी लावली म्हणून इंदिरा गांधींना पण जनतेने नाकारले होते. यांनी कागदावर धनुष्यबाण चोरलाय. आता भाजप बाळासाहेबांचा चेहरा लावून निवडणुका जिंकायच्या आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

 

कधीही निवडणुका कधीही लागतीलः उद्धव ठाकरे

आता शिंदे गटाला चिन्ह आणि नावं मिळालं आहे. त्यामुळे आता निवडणुका कधीही जाहिर होतील. आम्ही या निवडणुकाली मर्दासारखे सामोरे जाऊ. जनता माझ्यासोबत आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -