घरताज्या घडामोडीलोकशाही टिकवण्यासाठी कपिल सिब्बल यांना समर्थन देणं आवश्यक, उद्धव ठाकरेंचं आवाहन

लोकशाही टिकवण्यासाठी कपिल सिब्बल यांना समर्थन देणं आवश्यक, उद्धव ठाकरेंचं आवाहन

Subscribe

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. गुरुवारी शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील निरज कौल यांचा युक्तिवाद पूर्ण झाला. त्यानंतर ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी शिंदे गटाच्यावतीने बाजू मांडण्यास सुरुवात केली. सत्ताबदलाचा संपूर्ण तपशील ज्येष्ठ वकील साळवे यांनी न्यायालयासमोर मांडला. महाराष्ट्रात सत्ता बदल होत असताना गोष्टी एवढ्या वेगाने घडत होत्या की काय होणार याचा कोणालाच अंदाज नव्हता, असे ज्येष्ठ वकील साळवे यांनी न्यायालयाला सांगितले. दरम्यान, लोकशाही टिकवण्यासाठी कपिल सिब्बल यांना समर्थन देणं आवश्यक असल्याचं आवाहन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी आज न्याय व्यवस्था आणि लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी एक व्यासपीठ उभारण्याचे केलेलं आवाहन स्वागतार्ह असून आपला यास पूर्ण पाठिंबा आहे. देशात लोकशाही जिवंत राहावी अशी ज्यांची इच्छा असेल त्या सगळ्यांनी कपिल सिब्बल यांना समर्थन देणे आवश्यक आहे आणि त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

मला या गोष्टीची खंत वाटते की, भारतातील सर्व वकील शांत बसले आहेत. देशातील सर्व वकील गप्प आणि शांत का बसलेत?, असा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. सर्व वकिलांनी सरकारविरोधात आवाज उठवला पाहिजे. कारण आवाज उठवला तरच कारवाई होते. सर्व वकिलांनी एकजूट दाखवली पाहिजे, असं वकील कपिल सिब्बल म्हणाले.

ज्येष्ठ वकील साळवे यांचा युक्तिवाद सुरु असताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पुढील सुनावणीची तारीख निश्चित करण्यासंदर्भात वकीलांशी चर्चा केली. साळवे यांनी पुढच्या सुनावणीत पाच मिनिटे युक्तिवाद करावा. त्यानंतर शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी युक्तिवाद करतील. त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर सॉलिसिटर जनरल यांची बाजू आम्ही ऐकू. सॉलिसिटर जनरल यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर मग आम्हाला सिब्बल यांना प्रत्त्युतर सादर करण्यासाठी पूर्ण वेळ द्यायचा आहे. त्यासाठी सिब्बल व सिंघवी यांना शिंदे गटाच्या वकीलांशी याबाबत बोलावे लागेल. पण आम्हाला वाटतं नाही ते शिंदे गटाच्या वकीलांची न्यायालयात मदत घेतली, अशी टिप्पणी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली. त्यानंतर न्यायालयाने यावरील पुढील सुनावणी १६ मार्चला होणार असल्याचे स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा : सरन्यायाधीश म्हणाले, आम्हाला वाटतं नाही ठाकरे गट शिंदे गटाची मदत घेईल; पुढील सुनावणी १६


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -