AUS vs SA : ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेट्स राखून केला पराभव
ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण अफ्रिकेचा दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत केला पराभव
विश्वचषक ट्रॉफीसाठी अंतिम फेरीत आता भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत.
ठाकरे-शिंदे गटाला पोलिसांनी स्मृतीस्थळावरून काढलं बाहेर
सध्या शिवाजी पार्कवर चोख पोलीस बंदोबस्त
बाळासाहेबांना आपण गमावलंय या भीतीपोटी ते कोणत्याही थराला जात आहेत – एकनाथ शिंदे
बाळासाहेबांच्या सृतीदिनी कोणताही वाद नको, गालबोट लागायला नको म्हणून सामंजसपणाची भूमीका घेत मी पूर्वसंध्येला दर्शन घ्यायला जात असतो. त्यामुळे आज ठाकरे गटाने तिथे दाखल होऊन वाद घालण्याची कोणतीही गरज नव्हती. परंतु, बाळासाहेबांना आपण गमावलंय या भीतीपोटी ते कोणत्याही थराला जात आहेत, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
स्मृतीस्थळी अफझलखानाच्या अनौरस पिलावळीने जाणे बरे नाही – संजय राऊत
शिवतीर्थावरील आदरणीय शिवसेना प्रमुखांचे स्मृती स्थळ पवित्र आहे.त्याचे पावित्र्य राखा याला हवे.छत्रपती संभाजी राजे यांच्या स्मृति स्थळावर औरंग्याची पिलावळ जाणे मान्य नाहीं.त्या प्रमाणे शिवतीर्थावर स्मृतीस्थळी अफझलखानाच्या अनौरस पिलावळीने जाणे बरे नाही. पावित्र्य भंग होईल.शिवसैनिक एका निष्ठेने भिडणाराच!
शिवतीर्थावरील आदरणीय शिवसेना प्रमुखांचे स्मृती स्थळ पवित्र आहे.त्याचे पावित्र्य राखा याला हवे.छत्रपती संभाजी राजे यांच्या स्मृति स्थळावर औरंग्याची पिलावळ जाणे मान्य नाहीं.त्या प्रमाणे शिवतीर्थावर स्मृती स्थळी अफझलखानाच्या अनौरस पिलावळीने जाणे बरे नाही. पावित्र्य भंग… pic.twitter.com/PHXlj0BQwt
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 16, 2023
आदित्य ठाकरेंकडून लोअर परेलमधील उड्डाणपुलाच्या दुसऱ्या लेनचं उद्धाटन
शिवाजी पार्कवर ठाकरे गट – शिंदे गट आमनेसामने
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल
शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांची शिवाजी पार्कवर मोठी गर्दी
19 तारखेला चक्काजाम आंदोलन होणारच – राजू शेट्टींचा इशारा
ऊस दराबबात हसन मुश्रीफ यांच्याकडून समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला, मात्र राजू शेट्टी यांनी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे आता ऊस दर आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. अशातच राजू शेट्टी यांनी 19 तारखेला चक्काजाम आंदोलन होणारच असा इशारा दिला आहे.
एकनाथ शिंदे दादर येथील कासारवाडी स्वच्छता कामगार वसाहतीत दाखल
AUS vs SA : ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 212 धावांवर रोखले
डेव्हिड मिलरचे शतक पूर्ण
नवी मुंबई मेट्रो उद्यापासून धावणार
बेलापूर ते पेंधर मार्गावर धावणार पहिली मेट्रो
मराठ्यांचं 24 डिसेंबरला होणार कल्याण – मनोज जरांगे
माझ्या वाट्याला जे कष्ट आले ते लेकराच्या नशिबी येऊ नये. अनेकांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आहे. पण, आता मराठ्यांचं 24 डिसेंबरला कल्याण होणार, असे वक्तव्य मनोज जरांगे यांनी दौंड येथील केले.
मंत्रीमंडळाची बैठक उद्या ( शुक्रवार)
अद्वय हिरे मालेगाव कोर्टात दाखल
अद्वय हिरे यांना 20 नोव्हेंबरपर्यंत कोठडी
इटावामध्ये 12 तासांत दुसऱ्या ट्रेनला आग; बिहारला जाणाऱ्या वैशाली एक्स्प्रेसचा भीषण अपघात
उत्तर प्रदेशातील इटावा येथे दुसरा मोठा रेल्वे अपघात झाला. येथे दिल्लीहून सहरसाकडे जाणाऱ्या वैशाली एक्सप्रेस क्रमांक 12554मध्ये आग लागली. ही घटना पॅन्ट्री कारजवळील एस 6 कोचच्या बोगीमध्ये घडली, ज्यामध्ये 19 प्रवासी जखमी झाले. इटावामध्ये 12 तासांत ही दुसरी घटना घडली आहे. या घटनेमागे नेमके कारण काय, हे सध्यातरी कळू शकलेले नाही. रेल्वे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ठाकरेंना मोठा धक्का; दादा भुसेंचे कट्टर विरोधक असलेल्या अद्वय हिरेंना अटक
रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसाठी कर्ज घेण्याकरता बनावट दस्ताऐवज तयार करून जिल्हा बँकेची 7 कोटी 46 लाख रुपयांचं कर्ज उचलून फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.