बारसू प्रकल्पाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला विचारले प्रश्न, म्हणाले…

‘हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केला तर, ही हुकूमशाही तोडून-मोडून टाकीन आणि महाराष्ट्र पेटवून यांना हकलवीन’, असा इशारा बारसू प्रकल्पाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी दिला आहे. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारसमोर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Uddhav Thackeray asked questions to government on issue of Barsu project

रत्नागिरीतील बारसू रिफायनरीला स्थानिकांनी प्रचंड विरोध केला आहे. रिफायनरीला नकार देत आंदोलन केले जात आहे. या आंदोलकांची आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी बारसूतील आंदोलकांशी संवाद साधला. त्यावेळी ठाकरेंनी राज्याकर्त्यांना बारसूत येऊन रिफायनरीचे सर्मथन करून दाखवा असे आव्हान दिले. तसेच, ‘हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केला तर, ही हुकूमशाही तोडून-मोडून टाकीन आणि महाराष्ट्र पेटवून यांना हकलवीन’, असा इशाराही ठाकरेंनी दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. (Uddhav Thackeray asked questions to government on issue of Barsu project)

हेही वाचा – कातळशिल्पाच्या जागेच्या मातीची चाचपणी केली तर… उद्धव ठाकरेंनी दिला इशारा

मात्र, उद्धव ठाकरे यांच्या आधी खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली. काही वर्षांपूर्वी स्वतः नारायण राणे यांनी मी कोणत्याही पक्षात असलो तरी मी या रिफायनरी प्रकल्पाचा कडवा विरोधक आहे, असे त्यांच्या आत्मचरित्रात म्हंटले होते. यांवर उत्तर देत उद्धव ठाकरे म्हणाले की त्यांनी त्यांचा आत्मा विकला असेल. तसेच हा रिफायनरी प्रकल्पामुळे विनाश कसा होऊ शकतो, ही नारायण राणेंनी लिहिलेली माहिती विनायक राऊत यांनी वाचून दाखवली.

बारसूमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, नाणारमध्ये प्रकल्प होऊ नये, या मागणीला पाठिंबा देऊन शिवसेना आंदोलनात उतरली होती. त्यानंतर तो प्रकल्प आम्ही तिथून घालवला. त्यावेळी माझी भूमिका स्पष्ट होती की, प्रकल्पाला विरोध किंवा समर्थन हे आमच्या मनाने किंवा बसल्याजागी करत नाही. तर ज्या कोणालाही हा प्रकल्प पाहिजे असेल आणि जर का तिथे त्याचे स्वागत होत असेल तर तो प्रकल्प जरूर जावा. त्यावेळी आशिष देशमुख यांनी हा प्रकल्प विदर्भात देण्याची मागणी केली होती. पण हा प्रकल्प पाण्याच्या बाजूला लागतो, असे सांगितले. पण ते म्हणाले की आम्ही बघतो.

प्रकल्प इथे झाला तर फायदा, गद्दारांनी दिली होती माहिती
मी मुख्यमंत्री झाल्यानंतर जे आता सुपारी घेऊन फिरत आहेत, त्या गद्दारांनी मला सांगितले की बारसूमध्ये हा प्रकल्प झाला तर तिथल्या लोकांचा याला विरोध नाही. बरीचशी जमीन ही निर्मनुष्य आहे. पर्यावरणाची हानी होणार नाही किंवा कमी होईल. हा प्रकल्प तिथे आला तर एक चांगला प्रकल्प आपल्या राज्याला मिळेल. त्यामुळे बारसूच्या जागेसंदर्भातील पत्र केंद्राला पाठवले, अशी माहिती यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली.

उद्धव ठाकरेंचे सरकारला प्रश्न
नुसतं पत्राचं भांडवल केलं जात. पण जो पारदर्शकपणा यामध्ये पाहिजे. जर हा प्रकल्प चांगला आहे, तर महाराष्ट्रातले सगळे पोलीस आज बारसूमध्ये का आणले? घराघरांमध्ये पोलीस का घुसवून ठेवलेले आहेत. इथल्या लोकांवर लाठीहल्ला का केला जातोय? जसे मी गावकऱ्यांमध्ये आलो तसे ते का येत नाहियेत, असे प्रश्न उद्धव ठाकरे यांच्याकडून यावेळी उपस्थित करण्यात आले.बारसू प्रकल्पाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला विचारले प्रश्न, म्हणाले…