घरमहाराष्ट्र'ते 16 आमदार अपात्र ठरतील' उद्धव ठाकरेंची सर्वोच्च न्यायालयाकडे 'ही' मागणी

‘ते 16 आमदार अपात्र ठरतील’ उद्धव ठाकरेंची सर्वोच्च न्यायालयाकडे ‘ही’ मागणी

Subscribe

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या पक्षचिन्हावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. सुप्रीम कोर्टात 14 फेब्रुवारीपासून शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हावरील वादावर सलग सुनावणी होणार आहे. या सुनावणीपूर्वी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच शिंदे गटातील ते 16 आमदार अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवत उद्धव ठाकरेंनी या अपात्रतेच्या मुद्द्यावर आधी निर्णय द्या, तोपर्यंत निवडणूक आयोगाचा निकाल लागू नये, अशी मागणी केली आहे. तसेच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी शिवसेनेच्या चिन्हावर निकाल लागू नये अशी मागणीही त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केल आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, 16 आमदार अपात्र ठरण्याची शक्यता दाट आहे. सगळ्या घटनातज्ञ आणि घटनेत नमूद केल्याप्रमाणे त्याचा निकाल आधी लागावा अशी आमची अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने काय करावं हे सांगण्याचा आमचा हेतू नाही, मात्र सदस्य आपात्रतेचा निर्णय आधी झाला पाहिजे. त्याआधी निवडणूक आयोगाचा निकाल लागू नये असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

शिवसेनेने बनवलेल्या घटनेनुसार पक्षातील निवडणूका होतात. त्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली ती मिळालेली नाही. या घटनेनुसारच शिवसेना पदाधिकारी आणि पद निर्माण केली गेली आहेत त्याच्या उल्लेख त्याच नमुद आहे, शिवसेनेत मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. ज्या गद्दारांनी शिवसेनेवर दावा सांगितला आहे त्या गद्दारांनी एकदा शिवसेनेची घटनाचं आम्हाला मान्य नाही असं सांगितलं, त्यानंतर शिवसेनेच्या घटनेनुसार काही पदांची निर्मिती केली, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.

शिंदे गटात विभागप्रमुख एक पद आहे. विभागप्रमुख हे पद शिवसेनेत केवळ मुंबई आणि मुंबई शहरांमध्येच आहे. इतरत्र विभाग प्रमुख हे पद निर्माण केलं आहे, निवडणूक आयोगाने ज्या गोष्टी सांगितल्या त्या पूर्ण केल्या. पण आता जर गद्दार गटाचा दावा असा असेल की, निवडणूक आलेले आमदार, खासदार, सदस्य म्हणजे पक्ष आहे आणि त्या आधारावर तुम्ही निर्णय द्या, तर हे हास्यास्पद आणि विचित्रपणाचं आहे, अशी गंभीर टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.

- Advertisement -

गद्दारांनी शिवसेनेवर दावा करावा हे अत्यंत नीचपणाचं आणि विकृत कृत्य आहे, त्यांनी आधी पात्रतेचा फैसला हा आधी करावा, कारण हा मुद्दा आधी सर्वोच्च न्यायलायात गेला आहे, त्यानंतर जुलैमध्ये  गद्दार गट निवडणूक आयोगाकडे गेला, त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर दावा केला, असही उद्धव ठाकरेंनी नमूद केलं आहे.


..तर उद्या एक दोन नंबरचे उद्योगपतीही PM, CM होतील; उद्धव ठाकरे शिंदे गटावर पुन्हा बरसले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -