घरताज्या घडामोडीज्यांना शेंदूर फासला ते शिवसेना गिळायला निघालेत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

ज्यांना शेंदूर फासला ते शिवसेना गिळायला निघालेत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Subscribe

मुंबईतील शिवडी येथील अभ्युदयनगर येथील शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. यावेळी शिवसैनिकांनी गर्दी केली असून शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, महापौर किशोरी पेडणेकर, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. दरम्यान, ज्यांना शेंदूर फासला ते शिवसेना गिळायला निघालेत, असा हल्लाबोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

ज्यांना शेंदूर फासला ते शिवसेना गिळायला निघालेत

उद्धव ठाकरे यांनी शाखेच्या उद्घाटनावेळी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ज्या शिवसेनेने या सर्वांना दगडाला शेंदूर फासला होता. ते आता शिवसेना गिळायला निघाले आहेत. त्यांना भाजपची साथ आहे, भाजपला अंदाज नाही, कोणत्या शक्तीसोबत पंगा घेतलाय. भाजपला ठाकरे आणि शिवसेना हे नातं संपवाचं आहे. कळसूत्री बावल्यांच्या संचालकांना शिवसेना संपवायची आहे. त्यांना मुंबईवरचा आपला भगवा ठसा पुसून टाकायचा आहे आणि स्वत:चा ठसा उमटवायचा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

तेव्हा नाही म्हणाले मग आता कसं जमलं?

२०१९ च्या निवडणुकीत आपले जे भाजपसोबत करार ठरले होते. त्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली. ही निवडणूक आपण जिंकलो. केंद्रात जे नको होतं तेच मंत्रिपदं दिलं. त्यावेळी त्यांनी अपक्ष आमदारांना साथ देत शिवसेनेच्या जागा पाडल्या. अडीच-अडीच वर्ष सत्ता द्या म्हटले होते. तेव्हा नाही म्हणाले मग आता कसं जमलं. हे आधीच झालं असतं, तर सन्मानानं झालं असतं. मनावर दगड ठेवून आज जे करावं लागलंय ते कोणत्यातरी भाजपच्या एका दगडाला पाच किंवा अडीच वर्षात शेंदूर लागला असता, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.

त्यांचा केमिकल लोचा झाला असेल

अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्याकडून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. गद्दारांना कुठल्या ना कुठल्या पक्षात जाण्याशिवाय पर्याय नाही, असे अनेक तज्ज्ञ सांगतात. ते कुठल्या पक्षात जाणार?, काल त्यांना एका पक्षाने ऑफर दिली आहे. किती जणांचा केमिकल लोचा झाला असेल हे सांगताही येत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

- Advertisement -

शिवसेनेची मुळं अद्यापही घट्ट

गेले बरेच दिवस अरविंद माझ्या मागे लागले होते की, कार्यालयाचं उद्घाटन करायचं आहे. पण मी त्याकडे दुर्लक्ष करत होतो. परंतु आमदार आणि खासदार जे बोलतीय त्यांचं ऐकावं लागतं, असे हल्लीचे दिवस आहेत. कारण नक्की समजतंच नाही कोण-कोणाबरोबर आहे. कितीही वादळ आणि झंझावत येतील पण शिवसेनेची मुळं अद्यापही घट्ट आहेत. जे शिवसेना सोडून गेलेत त्यांचं कोणत्या भाषेत वर्णन करायचं. हे संपूर्ण जग बोलतयं. आम्हाला गद्दार बोलू नका, अशी विनंती त्यांनी केली. पण तुम्ही तुमच्या स्वत: च्या हाताने कपाळावर शिक्का मारून घेतलाय त्यामुळे मी बोलतोय. जे गेले आहेत त्यांच्यासोबत सच्चा शिवसैनिक एक सुद्धा गेलेला नाही. जिथे शिवसैनिक असतो तिथे सत्ता असते. आज दोन्ही आमदार आणि खासदार माझ्या दोन्ही बाजूला आहेत. जे आता गेलेत ते अशा गर्दीत आपली हिंमत दाखवू शकतील का?, ज्यांनी तुम्हाला निवडून दिलंय त्यांच्यापासून तुम्हाला पोलीस बंदोबस्त लागतो, अजय चौधरी यांना विधीमंडळाचे गटनेता केले आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : हकालपट्टीसाठी वेगळी समितीच नेमावी, रामदास कदमांनी उडवली खिल्ली


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -