घरमहाराष्ट्रशिवसेनेला हिंदूद्रोही ठरविण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा

शिवसेनेला हिंदूद्रोही ठरविण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा

Subscribe

शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने पदाधिकाऱ्यांशी संवाद

पश्चिम बंगाल आणि केरळसारखे आपल्याला हिंदू द्रोही ठरवायचा प्रयत्न सुरू आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भाजपवर निशाणा साधला. आपण नेहमी म्हणतो महाराष्ट्र दिशा दाखवतो. आता महाराष्ट्राने पुन्हा एकदा दिशा दाखवायची असून हिंदूंमध्ये फोडाफोड, महाराष्ट्रात मराठी- अमराठी ही भाजपची चाल आहे, अशी घणाघाती टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या शिवसंपर्क अभियान टप्पा २ च्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील शिवसेना जिल्हाप्रमुख, जिल्हासंपर्कप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला.

- Advertisement -

‘संयुक्त महाराष्ट्र समिती कुणी आणि कशी फोडली? मुंबई आपण लढवून मिळवली. ती जनसंघाने जागांसाठी फोडली. त्यामुळे यांचे मराठी आणि हिंदुत्वावर प्रेम नाही. यांना सगळे स्वतः करता हवे आहे. साहेब म्हणायचे जे कर्माने मरणार त्याला धर्माने काय मारायचे, अशी टीका ठाकरे यांनी भाजपवर केली.

ज्या ज्या ठिकाणी भाजप तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सामना होईल,त्या त्या ठिकाणी जशास तसे उत्तर द्या. शिवसेनेचे हिंदुत्व काय असते ते दाखवून द्या.मी लवकरच राज्यभर दौरा करणार आहे.तुमच्या भेटीला येणार आहे.मी शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून या मस्तांध शक्तिविरोधात लढणार आहे. त्यासाठी तुम्ही सज्ज रहा,असा आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिला.

- Advertisement -

जन्मापासून शिवसेनेकडे नवीन तरुण रक्त आहे. गावागावातून शिवसैनिकांकडे सातत्याने लक्ष द्या आणि बदल करा. पूर्वी शाखेचे बोर्ड होते, शाखा कार्यालय होते ते बघा, असे करत शिवसेना वाढवायची आहे. शिवसैनिक अंगार आहे. गावाची आणि जनतेची कामेसुध्दा करून घ्या, अशा सूचना ठाकरे यांनी दिल्या.

‘शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे हे दाखवण्यासाठी शिवसंपर्क अभियान आहे. मी तुमच्यासोबत फिरण्यासाठी धोके पत्करून शस्त्रक्रिया केली . आता मी फिरणार आहे’
उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -