घरताज्या घडामोडीटिळकांच्या घराण्याला उमेदवारी नाही, गिरीश बापट आजारी असतानाही..; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

टिळकांच्या घराण्याला उमेदवारी नाही, गिरीश बापट आजारी असतानाही..; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Subscribe

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज आयोजित प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी टिळकांच्या घराण्याला उमेदवारी नाही आणि गिरीश बापट आजारी असतानाही त्यांना प्रचारात उतरवले, असं म्हणत भाजपवर निशाणा साधला.

पोटनिवडणूक अशा पद्धतीने लढवावी लागेल, असं कधी वाटलं नव्हतं. राजकारणात निवडणुका जिंकणं आणि त्या जिंकण्याची ईष्या असणं काही नवीन नाही. आपल्या विरोधकावर मात करण्याची जिद्द बाळगावी लागते. पण आपला विरोधक अशा पद्दतीने निघून जावा अशी कोणाची इच्छा नसते. लक्ष्मणराव आणि मुक्ताताई यांना मी श्रद्धांजली वाहतो. ते माझे विधीमंडळातील सहकारी होते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

मतमतांतर असतात आणि ते असलंच पाहीजे. तसेच ते मांडण्याचं स्वातंत्र्य असलं पाहीजे. यालाच तर लोकशाही म्हणतात. पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती असं काहींचं म्हणणं आहे. मी त्यांच्या भावनेचा आदर करतो. पण निवडणूक बिनविरोध करताना लोकशाहीतील मोकळेपणा राहिला आहे का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातील व्यक्तीलाच उमेदवारी दिल्याने निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती असं ज्यांना वाटत आहे, तर मग लोकमान्यांच्या घरातील व्यक्तीला दुर्लक्षित केलं तेव्हा सहानुभूती कुठे गेली. तिथे तर टिळकांचं घराणं वापरुन सोडून दिलं. प्रत्येक पक्षाचा तो एक अधिकार असतो. मात्र, उमेदवारी दुसऱ्याला दिल्यानंतर मला वाईट एका गोष्टीचं वाटलं आणि माझा जीव तळमळला. कारण गिरीश बापट यांच्या उमेदीचा काळ मी पाहिला आहे. शिवसेनाप्रमुख ज्यावेळी पुण्याला यायचे, तेव्हा गिरीश बापट हे चर्चेत येत असतं. त्यांच्या प्रचाराच्या सभेला सुद्धा शिवसेनाप्रमुख येऊन गेले असतील.

- Advertisement -

टिळकांच्या कुटुंबीयांना कोणालाही उमेदवारी न देता, त्यांची उमेदवारी बदलण्यात आली. सगळ्यात एक क्रूरतेचा कळस म्हणजे गिरीश बापट यांना ऑक्सिजनच्या नळ्या नाकात घालून त्यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी बोलावलं. ही लोकशाही आहे का?, अशा पद्धतीने लोकांचा वापर करायचा आणि त्यांना फेकून द्यायचं. अशा पक्षाला आपण मतदान करायचं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

जेव्हा आपलं सरकार होतं, तेव्हा याच माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्र सांभाळला होता. तसेच सर्व जनतेने आम्ही जे काही सांगत होतो, त्याचं पूर्णपणे पालन केलं होतं. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. मी मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि जयंत पाटील हे माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी होते. त्या काळात मी या सर्वांचा उल्लेख मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनो असा करायचो. त्यानंतर जे काही घडतेय आणि घडले ते मी पाहत आहे. शिवसेनेची लढाई सुरू आहे. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते कठिण काळात सहकार्य करीत आहेत, असंही ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : आदित्य ठाकरेंच्या भाषणाची नवी शैली; हसत-खिदळत सरकारवर राग


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -