घरताज्या घडामोडीहिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

Subscribe

उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथे उत्तर भारतीय समाजाच्या मेळाव्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही असा घणाघात त्यांनी यावेळी केला.

गोरेगाव येथे झालेल्या उत्तर भारतीय समाजाच्या मेळाव्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी गोरेगावमधील उत्तर भारतीय समाजाशी संवाद साधला. तसेच त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप पक्ष आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. हा उत्तर भारतीय समाजाचा मेळावा नाही तर बैठक आहे, मेळावा घ्यायचे म्हंटले तर मैदान कमी पडेल असेही उद्धव ठाकरे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही हिंदू आहोत म्हणून फक्त मराठी आहोत, असे होत नाही. त्यामुळे हिंदू भाषिकांचा द्वेष करणे असे होत नाही किंवा मुस्लिमांचा द्वेष करणे होत नाही. आम्ही हिंदुत्वाला सोडले नाही. आम्ही भाजपची साथ सोडली याचा अर्थ असा नाही की आमही हिंदुत्व सोडले. भाजप म्हणजे हिदुत्व नाही. ते सध्या जे हिंदुत्व घेऊन चालत आहे त्याला मी हिंदुत्व मानत नाही. कधीही त्यांच्या मनात आले ते सांगत जातात आणि आपण ते मान्य करत जातो. ‘

- Advertisement -

गळ्यात पट्टा बांधुन फिरणे आमचे हिंदुत्व नाही
जर आम्ही युती तोडून काँग्रेसशी हात मिळवणी केली आहे तर त्यासाठी आम्हाला भाजपने भाग पाडले. जर भाजपसोबत जावे लागले असते तर गळ्यात पट्टा बांधून फिरावे लागले असते. जसे की आज आमची काही लोक गळ्यात पट्टा बांधून त्यांच्याकडे गेले आहेत. हे आमचे हिंदुत्व नाही. गळ्यात पट्टा बांधून कोणाची तरी गुलामगिरी करणे हे मला माझ्या शिवसेना प्रमुखांनी शिकवले नाही आणि ते मी कधीच करणार नाही, असा टोला त्यांनी शिंदे गट आणि भाजप पक्षाला लगावला.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, मी काँग्रेससोबत गेल्याने मी हिंदुत्व सोडले असे बोलले जात आहे. आज तुमच्याशी बोलत आहे तर काही लोक बोलतील की मी आता उत्तर भारतीयांच्या मागे पडलो आहे. पण जेव्हा मोदी येऊन बोहरा समाजाच्या भाकऱ्या भाजतात तेव्हा.. हेच जर का मी केले असते तर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले असे बोलले गेले असते. मी कधीही हिंदू-मुस्लिम, मराठी अमराठी असा भेद केला नाही, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – छत्रपती उदयनराजे भोसलेंचा भगतसिंह कोश्यारींविरोधात संताप

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मला बाळासाहेबांचं कोणतंही एक वाक्य किंवा एक शब्द ही काढून दाखवा, ज्यात ते म्हणाले आहेत, आपण हिंदू आहोत म्हणजे फक्त मराठीच, हिंदी भाषिक लोकांचा द्वेष करा. आपण हिंदू आहोत, म्हणून आपण एक आहोत, म्हणून मुस्लिम लोकांचा द्वेष करा, ते असं कधीही म्हणाले नाही. जे आपल्या देशाच्या विरोधात आहेत, ते कुठल्याही धर्माचे असू द्या, तो जरी हिंदूही असला तरी देशविरोधी काम करत असेल, तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -