घरमहाराष्ट्रUddhav Thackeray : "...तर मग सामान्य जनतेचे काय होणार?" गोळीबार प्रकरणावरून उद्धव...

Uddhav Thackeray : “…तर मग सामान्य जनतेचे काय होणार?” गोळीबार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Subscribe

कोकण दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी कुडाळमधील सभेमधून कल्याणमधील गोळीबार प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

कुडाळ : सरकारमध्ये आता गँगवॉर सुरू झाले आहे. शिंदे गँग, भाजपा गँग. असे कधीच झाले नव्हते की, सरकारामध्ये सहभागी असलेल्या दोन पक्षांच्या लोकांमध्ये गोळीबार झाला आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे आज आणि उद्या अशा दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. या दोन्ही दिवशी त्यांच्या तीन-तीन सभा होणार आहेत. ठाकरेंची पहिली सभा ही सावंतवाडीमध्ये झाली, तर दुसरी सभा ही कुडाळमध्ये पार पडली. त्यांची तिसरी सभा सायंकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या मैदानात होणार आहे. परंतु, कुडाळमधील सभेमधून उद्धव ठाकरे यांनी कल्याणमधील गोळीबार प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. (Uddhav Thackeray attacked the government over the firing case in Kalyan)

हेही वाचा… Thackeray On Fadnavis : “हुडी घालून करामती केल्या ते भाजपावरच उलटल्या”, उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका

- Advertisement -

कल्याणमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकडवाड यांच्यावर शुक्रवारी गोळीबार केला. या प्रकरणावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेही आपल्या प्रत्येक सभेत या प्रकरणावरून सरकारवर हल्लबोल करत आहेत. कुडाळमधील सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्तेच्या हव्यासापायी पंतप्रधानांनी ज्यांना आपल्या पक्षात घेतले आहे, हे तुमचे हिंदुत्व आहे का? तुमचे पंतप्रधान आहेत. पाव उपमुख्यमंत्री तुमचे आहे, गृहमंत्रीही तुमचे आहे. तरी देखील तुमच्या आमदाराला स्वतःच्या रक्षणासाठी पोलीस ठाण्यात गोळीबार करावा लागत आहे. गणपत गायकवाड यांचा गोळीबार करतानाच व्हिडीओ समोर आलेला आहे. त्यांना शिक्षा होईल, जे काही असेल ते त्यांच बघून घेतील. पण गोळीबार का करावा लागला? याचा विचार पंतप्रधान आणि गृहमंत्री फडणवीस करणार आहेत का?, असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

तसेच, जर का पंतप्रधानांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणात कोणताही निर्णय घेण्याची ताकद ठेवली असेल तर ते निर्णय घेणार आहेत का? सरकारचे तुमच्या आमदाराला पोलीस ठाण्यात गोळीबार करण्याची वेळ का आली? गायकवाड यांच्या मुलाला धक्काबुक्की झाली म्हणून त्यांनी हे कृत्य केले. पण जर काही ही वेळ देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपा आमदारावर येत असेल तर यांच्या हातामध्ये सत्ता ठेवली तर सामान्य जनतेचे काय हाल होणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांच्याकडून विचारण्यात आला आहे. त्याशिवाय, वैभव नाईक यांनाही आव्हान देण्यात आले तेव्हा ते एकटे भिडले होते. सिंधुदुर्गातील लोकांनी मागच्या निवडणुकीतच गद्दार आणि हुकूमशाही करणाऱ्या सरकारचा सुपडा साफ केलेला आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -