घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांची सहानुभूती मारून मुटकून मिळवण्याचा प्रयत्न- चंद्रकांत पाटील

उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांची सहानुभूती मारून मुटकून मिळवण्याचा प्रयत्न- चंद्रकांत पाटील

Subscribe

चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना उपरोधिक सल्लाही दिलाय. मारुतीचा फोटो बाहेर आणून लावला पाहिजे होता, प्रसादाची व्यवस्था करायला पाहिजे होती, मग हवाच निघाली असती ना, पण काय चाललंय ते मला काहीच कळत नाही, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

मुंबईः खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या खारमधील घराबाहेर शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाला पांगवलं. त्याच मुद्द्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय.

चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना उपरोधिक सल्लाही दिलाय. मारुतीचा फोटो बाहेर आणून लावला पाहिजे होता, प्रसादाची व्यवस्था करायला पाहिजे होती, मग हवाच निघाली असती ना, पण काय चाललंय ते मला काहीच कळत नाही, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

- Advertisement -

मशिदीवरील भोंगे काढले नाहीत तर आम्ही हनुमान चालिसा म्हणणार आहे. हनुमान चालिसा म्हणणार असाल तर मोहित कंबोजनं माईकसेट दिलेत, तर त्यात तुम्हाला अडचण काय आहे. अजानचा अर्थ आहे. जसं आपण देवळात जातो आणि शंकराचं स्त्रोत्र सुरू असते, तसं अजान आहे. नमाजला न येणाऱ्यांना ते ऐकू जाईल. मुळात नमाज पठण करण्यासाठी न येणाऱ्यांना येण्यासाठी प्रवृत्त करा. मशिदीमध्ये अजान ऐकायला मिळावी यासाठी मशिदीमध्ये तशी व्यवस्था करा. महिला नमाज अदा करायला येत नाहीत. त्यांच्या स्मार्टफोनमध्ये अजान टाकता येईल. घरी अजान लावायचं आणि सगळ्या महिलांनी घरात नमाज अदा करायचा. हे वादग्रस्त मुद्दे का निर्माण होत आहे, मला काही कळत नाही, असंही ते म्हणाले आहेत.

केवळ शिवसैनिकांची सहानुभूती मारून मुटकून मिळवता आहेत. सर्वसामान्यांची सहानुभूती हनुमान चालिसाचा आग्रह धरणाऱ्या राज ठाकरेंच्या प्रतीच आहे. हनुमान चालिसा म्हणण्यात काय प्रॉब्लेम आहे. कशासाठी तुम्ही अडवताय आणि कशासाठी भोंगे उतरवत नाही आहात. आता एक एक स्टेप मागे चालला आहात ना, सकाळी सहा ते रात्री दहाच लावता येईल. मशिदींमध्ये अजान ऐकण्याची व्यवस्था करा, स्मार्टफोनमध्ये अजान ऐका, ज्यांचा याच्याशी काही संबंध नाही त्यांना कशाला तुम्ही ऐकवता, असंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलंय.

- Advertisement -

हेही वाचाः मुख्यमंत्र्यांनीच शिवसैनिकांना हल्ला करण्यास सांगितले पण आम्ही जाणारच, रवी राणांचा आरोप

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -