Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रUddhav Thackeray : तुम्ही महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली; असं कोणाला म्हणाले उद्धव...

Uddhav Thackeray : तुम्ही महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली; असं कोणाला म्हणाले उद्धव ठाकरे?

Subscribe

मुंबई : मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी सभेत भाजपसह महायुतीवर हल्लाबोल केला. तसेच, यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे कौतुक करत भाजपला टोला लगावला. शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी त्यांनी, ‘संपूर्ण मुंबई ही अदानीच्या घशात घालत आहेत. जातील तिथे अदानी असे भाजपचे धोरण आहे.’ अशी टीका त्यांनी केली. (Uddhav Thackeray BKC Mahavikas aaghadi election rally criticized BJP and Mahayuti)

हेही वाचा : Maharashtra Assembly Election : दोघांचं भांडण अन् तिसऱ्याचा लाभ, पनवेल, पेण आणि उरणमध्ये मविआमध्येच जुंपली 

- Advertisement -

बीकेसीमधील सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, “पंकजा ताई तुझे खूप आभार, तू महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली. जसे आमच्या चंद्रचूड यांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी सोडून स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. तशी तू महाराष्ट्राच्या डोळ्यावरची काढली. यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका विधानाचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, “पंकजा ताई म्हणाल्या होत्या की, भाजपचे काम खूप भारी आहे. महाराष्ट्रात 90 हजार बुथ असून प्रत्येक बुथवर भाजपचे दक्षता पथक आहे. या पथकात जर दोन माणसे असतील तर त्यांची संख्या 1 लाख 80 हजार होते. जर 2 पेक्षा जास्त लोक असतील तर त्या पटीत त्यांची संख्या वाढेल. ही सर्व लोक भाजपने गुजरातमधून आणली आहेत.” असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

“भाजपाने ही माणसे आपल्यावर नजर ठेवायला आणली आहेत. ही आज नजर ठेवायला माणसे आणली असून उद्या यांचा आपली मुंबई आणि महाराष्ट्र बळकवण्याचा डाव आहे. हे तर आता फेक नरेटिव्ह नाही ना. कारण हे मी पंकजा मुंडे बोलल्यानंतर बोलत आहे. याचा अर्थ भाजप इथे पराभूत झालेली असून त्यांचे लोक इथे राहिलेले नाहीत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात राहिलेल्या भाजप प्रेमींवर भाजपाचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच त्यांना परराज्यातून माणसे आणून नजर ठेवावी लागत आहे,” असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

- Advertisement -

भाजपचे जिथे जाईल तिथे अदानी

“महायुती सरकारने फक्त धारावीच नव्हे तर संपूर्ण मुंबई अदानीच्या घशात घालत आहेत. भाजप जिथे जाते तिथे अदानी. णजे मी प्रचाराची सुरुवात केली कोल्हापूरपासून तेथील राधानगरीचे आमदार के. पी. पाटील यांनी सांगितले की, आमच्या भागातले पाणीदेखील अदानीला विकले आहे. चंद्रपूर गेलो तर तेथील खाणी आणि शाळादेखील अदानींना दिलेल्या आहेत. त्यानंतर आज (रविवारी, 17 नोव्हेंबर) पालघर गेलो होते, तर तिथले वाढवण बंदर झाल्यानंतर अदानीला देऊन टाकणार आहेत. विमानतळ अदानी, बंदर अदानी, आपल्याला वीज येते ती महाराष्ट्रभराची वीजदेखील अदानी, खाणी आणि उद्योगधंदेसुद्धा अदानीकडेच,” असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -