Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पूरग्रस्तांच्या प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, राजू शेट्टींना चर्चेचा प्रस्ताव

पूरग्रस्तांच्या प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, राजू शेट्टींना चर्चेचा प्रस्ताव

तुम्हाला राज्य करायचे असेल तर खुशाल करा पण आमच्या मुडद्यावर करा - राजू शेट्टी

Related Story

- Advertisement -

स्वाभीमानी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंचगंगा परिक्रमा यात्रा करुन पूरग्रस्त शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळाली नाही असा आरोप केला होता. स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांनी नदीपात्रात उड्या घेतल्या आहेत. राजू शेट्टींच्या आंदोलनाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी राजू शेट्टी यांना प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. सोमवारी दुपारी ३ वाजता राजू शेट्टी यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले असून पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर चर्चा कऱण्यात येणार आहे. केंद्र सरकारणे महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. चक्रीवादळाच्या वेळी मोदींनी गुजरातला तात्काळ १००० कोटी रुपये दिले मात्र महाराष्ट्राला दिले नाही. महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीवर कायमस्वरुपी उपाय केले पाहिजेत असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.

स्वाभीमानीचे नेते राजु शेट्टी यांनी म्हटलं आहे की,आता वारंवार पूरपरिस्थिती उद्भवणार आहे. कारण माणसानं निसर्गाचे लचके तोडले आहेत. आताचा पाऊस हा सर्वात जास्त पाऊस होता असे सरकारने सांगितले आहे. पाणी वाहून नेण्याएवढी नद्यांची क्षमता राहीली नाही यालाही काही कारणं आहेत. खाण माफियांनी डोंगर पोखरुन ठेवले आहेत यामुळे थोडा पाऊस पडला का डोंगर कोसळतायत त्याची माती नद्यांमध्ये गेल्यानं नद्या उथळ झाल्या आहेत. नद्यांवर पुल बांधण्यात आले आहेत यासाठी नद्यांमध्ये भराव टाकला गेलाय पुर्वी पूर यायचा दोन दिवसांत जायचा मात्र आता ८ ते १० दिवस हा पूर राहतोय अशी कारणं आहेत.

संकटांवर काहीतरी उपाय झाला पाहिजे

- Advertisement -

कोल्हापूर जिल्ह्यात ५६ पुल, सांगलीत ४८ आणि शेजरारच्या कर्नाटक जिल्ह्यात १६ असे १२० पुलं पुरपरिस्थितीला कारणीभूत ठरत आहे. कर्नाटक जिल्ह्यातील मांजरीच्या पुलामुळे कृष्णेचे पाणी पुढे सरकत नाही आहे. याचा फटका बसत आहे. मानवनिर्मित संकटांवर काहीतरी उपाय झाला पाहिजे. काही मंत्र्यांनी मत व्यक्त केले आहेत त्याच्यावर काही बोलत नाही. संरक्षण भींत बांधली तरी शहरे वाचतील मात्र खेडी वाचणार नाहीत असे राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रावर केंद्राकडून अन्याय

मागील १५ वर्षामध्ये ४ मोठे पूर आले याचा गांभीर्याने विचार केंद्र सरकार करणार आहे की नाही ? याच्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकार अन्याय करत आहे. महाराष्ट्रातील सर्वच प्रश्नांबाबत हे मत असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. तौत्के चक्रीवादळ आल्यावर पंतप्रधानांनी गुरजरातला १००० कोटी रुपये दिले मात्र तेच वादळ महाराष्ट्रातून गेलं होते परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकणासह महाराष्ट्राला मदत दिली नाही. केंद्रीय आपत्ती निधी कोणाच्या बापाची नाही त्यावर सर्व राज्यांचा अधिकार आहे. हा निधी नरेंद्र मोदींनी निर्माण केला नाही हा निधी १९५० साली देशाचे पहिले पंतप्रधान नेहरु यांनी निर्माण केला आहे. नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा तो निधी खर्च केला जातो त्यातलेच पैसे गुजरातला दिले तर महाराष्ट्राला का दिला नाही असा प्रश्न राजू शेट्टी यांनी केंद्राला केला आहे.

- Advertisement -

तुम्हाला राज्य करायचे असेल तर खुशाल करा पण आमच्या मुडद्यावर करा अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली आहे. हे आंदोलन आमच्या मागण्यांसाठी आणि लढ्यासाठी होते. आंदोलनामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारला पाझर फुटावा हाच हेतू होता. केंद्रीय जल आयोगाने तिन्ही राज्यांना बोलावून घेतले पाहिजे. यावर उपाय करता येईल का? अजून धरणांची निर्मिती करुन त्याच्या पाणी आडवून पूरात नियंत्रण आणता येईल का याचा आढावा घेतला पाहिजे होता असे राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्र्यांनी जाब विचारुन उत्तर द्यावे, महिला सरपंच मारहाण प्रकरणावरुन चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया


 

- Advertisement -