उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना दोनदा फोन, भाजप श्रेष्ठींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे कॅम्पमध्ये 6 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्री दिले जाऊ शकतात. सुरुवातीला 4 मंत्रिपदे रिक्त ठेवण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्रिपदासह मोठे मंत्रिपद दिले जाईल

मुंबईः महाराष्ट्रात मोठे राजकीय संकट असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली, मात्र केंद्रीय नेतृत्वाने उद्धव ठाकरेंच्या फोनवर येण्यास नकार दिला होता. भाजप शिवसेना नेतृत्वाशी चर्चा करणार नाही. उद्धव ठाकरेंशी बोलायचंच असेल तर बंडखोर गटाशी बोला, असं भाजपच्या श्रेष्ठींचं म्हणणं आहे.

महाराष्ट्रात सरकारचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजप शिंदे यांच्यासह सर्व पक्षांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देणार आहे. सहा आमदारांवर एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद दिले जाणार आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे कॅम्पमध्ये 6 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्री दिले जाऊ शकतात. सुरुवातीला 4 मंत्रिपदे रिक्त ठेवण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्रिपदासह मोठे मंत्रिपद दिले जाईल. तर भाजपकडे 18 कॅबिनेट मंत्री आणि सुमारे 10 राज्यमंत्री केले जाणार आहेत.

21 जून आणि त्यानंतरही उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फोन केल्याची चर्चा आहे. शिवसेनेचं सरकार वाचवण्यासाठी हे फोन केल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनेत शिंदे गट अशी फूट न पडता एकत्रित भाजपसोबत सत्ता स्थापन करता येते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकनाथ शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर फ्लोर टेस्टबाबत राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव सरकारविरोधात कधीही अविश्वास प्रस्ताव येऊ शकतो. त्याचवेळी शिंदे गटाच्या पाठिंब्याशिवायही भाजप सरकार स्थापनेचा दावा करू शकते. यात विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांनी भूमिका निर्णायक ठरू शकते. परंतु भाजपकडून यावर अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया दिली जात नाहीये.

सध्या राज्यातील सत्तासंघर्ष हा शिगेला पोहोचला असून, राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेसुद्धा सगळे पर्याय चाचपून पाहत आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी गुवाहाटीतील बंडखोर आमदारांना चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं. मुंबईत येऊन चर्चा करा, मग महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करू, असंही संजय राऊत म्हणालेत.


हेही वाचाः एकनाथ शिंदे आज मुंबईत येणार? महाविकास आघाडी सरकारची अग्निपरीक्षा