घरमहाराष्ट्रतुम्ही जमीन काय दाखवणार, आम्हीच आस्मान दाखवू; उद्धव ठाकरेंचं अमित शाहांना खुलं...

तुम्ही जमीन काय दाखवणार, आम्हीच आस्मान दाखवू; उद्धव ठाकरेंचं अमित शाहांना खुलं आव्हान

Subscribe

गणेशोत्सवाच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी मुंबईवर भाजपाने एकहाती सत्ता मिळवण्याची घोषणा केली होती. यावरून मुंबईवरून शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याचा घाट घातला असल्याची टिका शिवसेनेने केली. तसंच, मुंबई तुमच्यासाठी विकण्यासाठी स्क्वेअरफुटातील जमीन असेल. पण आमच्यासाठी मातृभूमी आहे, असंही ठाकरेंनी आज ठणकावून सांगितलं. 

मुंबई – शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच मोठी जाहीर सभा घेतली. या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच भाजपावर निशाणा साधला. मुंबईवर गिधाडं फिरायला लागली आहेत. लचके तोडणारी औलाद फिरायला लागली आहेत, असं म्हणत त्यांनी अमित शाहांना खुलं आव्हान दिलं आहे. तुम्ही आम्हाला जमीन दाखवली, आम्ही तुम्हाला आस्मान दाखवून, अशी जोरदार गर्जना उद्धव ठाकरेंनी आज केली.

हेही वाचा – …म्हणून मी कमळाबाई म्हणतो, उद्धव ठाकरेंची मेळाव्यात भाजपाविरोधात तुफान बॅटींग

- Advertisement -

उद्धव ठाकरे म्हणाले की, मुलं पळवणारी टोळी आपण ऐकली आहे. पण सध्या महाराष्ट्रात बाप पळवणारी अवलादी फिरत आहेत. एवढी वर्षे आपण सर्वांनी ज्यांना सत्तेचं दूध पाजलं, आता त्याच लोकांनी तोंडाची गटारगंगा उघडली आहे. मुंबईवर गिधाडं फिरायला लागली, लचके तोडणारी औलाद फिरायला लागली आहे. मुंबई तोडायची आहे त्यांना. लचके तोडायला तुम्ही देणार का? असा सवाल शिवसैनिकांना करत अमित शहांना आव्हान केलं. त्यांनी शिवसेनेला जमीन दाखवली, आपण त्यांना आस्मान दाखवू. त्यांना माहिती नाही की इथं जमिनीतून फक्त गवाताची पाती येत नाही तर, तलवारीच्याही पाती येतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – ही पहिली निवडणूक समजून तयारीला लागा; उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांना स्फुल्लिं

- Advertisement -

गणेशोत्सवाच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी मुंबईवर भाजपाने एकहाती सत्ता मिळवण्याची घोषणा केली होती. यावरून मुंबईवरून शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याचा घाट घातला असल्याची टिका शिवसेनेने केली. यावरूनच उद्धव ठाकरेंनी आज अमित शाहांवर निशाणा साधला.

“मी गिधाडं हा शब्द मुद्दाम वापरला आहे, कारण निवडणूक आल्यावर त्यांना मुंबई दिसते. पण जेव्हा मुंबईवर संकटं येतात, तेव्हा ही गिधाडं कुठे असतात? यांच्यासाठी मुंबई ही केवळी विकण्यासाठी मिळालेली स्वेअर फुटातील जमीन असेल. पण ही आमच्यासाठी केवळ जमीन नाही, मातृभूमी आहे. १०५ वीरांनी बलिदान देऊन मिळवलेली मातृभूमी आहे,” असंही ठाकरेंनी आज ठणकावून सांगितलं.

…नाहीतर रक्तपात होईल

“मुन्नाभाईला सोबत घेतलं, ठाकरे घराण्याला संपवण्याचा प्रयत्न केला. पण समोर असलेल्या जनसमुदयाकडे हात दाखवत उद्धव ठाकरे म्हणाले की हे माझं ठाकरे कुटुंब आहे. या प्रत्येकाच्या मनात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. तुमची मनं मेलेली असतील पण माझ्या शिवसैनिकातील मनं मेलेली नाहीत, मनगट चिरलेली नाहीत. शिवसेनेच्या वाट्याला यायचा प्रयत्न करू नका. काहींनी केलाय तरीही मी शांत राहण्याचं आवाहन केलंय. कारण शांत राहिलो नाही तर रक्तपात होईल. गद्दार आणि शिवसैनिकांमध्ये रक्तपात होईल,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – शिवसेनेच्या मेळाव्यात संजय राऊत? व्यासपीठावर खूर्ची ठेवली राखीव

संघर्षाच्या वाटेवरून चालण्याची हिंमत ठेवा

“यावेळेला लढाई कशी होणार हे लक्षात घ्या. मुंबई महापालिकेसाठी पंतप्रधान मैदानात उतरणार आहेत. मुन्नाभाई आहे.  सगळे एकत्र येऊन शिवसेनेवर तुटून पडणार आहेत. मर्द असतो तो याच लढाईची वाट पाहतो, आणि आम्ही त्याच लढाईची वाट पाहतोय. काही काळ तरी संघर्षाच्या वाटेवरून चालण्याची हिंमत आहे का,” अशी साद घालत मी आव्हान देतो की कोणतेही डावपेच यशस्वी होणार नाही.

शिवसैनिकांनी दर्ग्याचंही रक्षण केलं

“शिवसेनेसोबत मुस्लिम समाज आहे. अमराठी लोक आहेत. गुजराती, उत्तर प्रदेशची जनता आहे. कोरोना काळात कोणताही भेदभाव न करता मी सगळ्यांचे प्राण वाचवले. १९९२-१९९३ मध्ये देशद्रोह्यांनी थैमान घातलं होतं. तेव्हा शिवसैनिकांनी दर्ग्याचंही रक्षण केलं होतं. हीच आमच्या आजोबांची शिकवण आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे.

एकनाथ शिंदेंना अनुल्लेखाने मारलं

एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर त्यांच्यासह गेलेल्या आमदारांवर उद्धव ठाकरेंनी नेहमीच टीकास्त्र डागलं आहे. मात्र, आजच्या मेळाव्यात त्यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख कमी केला, मात्र, भाजपावर त्यांनी अधिक रोख ठेवला होता. अमित शाह, राज ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधत एकनाथ शिंदेंना अनुल्लेखाने मारलं असल्याचं राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -