घरमहाराष्ट्र"राजकारणातील संस्कृती जपणारा नेता सोडून गेला", बापटांच्या निधनावर उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला...

“राजकारणातील संस्कृती जपणारा नेता सोडून गेला”, बापटांच्या निधनावर उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला शोक

Subscribe

खासदार गिरीश बापट यांचे वयाच्या ७२व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले आहे. राजकारणातील कटुता वाढत असताना संस्कृती जपणारा नेता आपल्याला सोडून गेल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश सावंत यांचे आज बुधवारी (ता. २९ मार्च) निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राज्यासह देशभरातील नेत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली. तर आता त्यांनी पुन्हा एकदा बापटांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

“गिरीश बापट गेले. राजकारणातल्या जुन्या वळणाचा उत्तम माणूस म्हणून त्यांची ओळख होती. शिवसेना भाजपा युती असताना ज्यांनी सतत युती टिकावी यासाठी मनापासून प्रयत्न केले असे बापट होते. सगळ्यांना एकत्र ठेवणारा दिलदार नेता अशी त्यांची किर्ती होती. गिरीश बापट आणि पुणे असे एक समीकरण बनले होते.. शिवसेनेशी त्यांचा विशेष स्नेह होता..अनेकदा खुले पणाने ते मातोश्रीवर येत जात होते.महाराष्ट्राच्या राजकाणातील कटुता वाढत असताना संस्कृती जपणारा गिरीश बापट यांच्या सारखा नेता आपल्याला सोडून गेला. आई जगदंबा त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो..” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केले.

- Advertisement -

तर गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त येताच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ट्वीट केले होते. “भाजपचे ज्येष्ठ नेते, खासदार गिरीश बापट जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक व्यापक जनसंपर्क असलेला नेता आणि उत्कृष्ट संसदपटू गमावला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना,” असे ट्वीट ठाकरे यांनी केले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट आजारी होते. काल (ता. २८ मार्च) रात्रीपासून त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, आता काही वेळापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. कसबा पेठ विधानसभेतील किंगमेकर म्हणून खासदार गिरीश बापट यांची ओळख होती. ते मुळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहिले आहेत. नगरसेवक पदापासून स्वतःच्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली. पुढे १९९५ साली पहिल्यांदा त्यांनी आमदारकीची निवडणूक लडवली. त्यानंतर सलग पाच वेळा ते कसबा पेठेत आमदार म्हणून राहिले. तर १९९६ साली गिरीश बापटांनी लोकसभेसाठीही नशिब आजमावलं होतं. परंतु, त्यावेळी त्यांचा पराभव झाला. परंतु, २०१९ मध्ये त्यांनी लोकसभेसाठी पुन्हा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे मोहन जोशी यांचा तब्बल ९६ हजार मतांनी पराभव केला.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -