घरताज्या घडामोडीसभागृहाचे नियम प्रत्येक सदस्याने पाळायलाच हवेत; उद्धव ठाकरेंची गुलाबराव पाटलांवर टीका

सभागृहाचे नियम प्रत्येक सदस्याने पाळायलाच हवेत; उद्धव ठाकरेंची गुलाबराव पाटलांवर टीका

Subscribe

सभागृहात खडसावल्याबद्दल ताई धन्यवाद. सभागृहाचे नियम प्रत्येक सदस्याने पाळायलाच हवेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपसभापती निलम गोऱ्हेंच्या आडून मंत्री गुलाबराव पाटलांवर केली आहे.

सभागृहात खडसावल्याबद्दल धन्यवाद. सभागृहाचे नियम प्रत्येक सदस्याने पाळायलाच हवेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपसभापती निलम गोऱ्हेंच्या आडून मंत्री गुलाबराव पाटलांवर केली आहे. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. (Uddhav Thackeray criticism of Gulabrao Patil from Neelam Gorhe)

‘काल परवाकडेसुद्धा तुम्ही सभागृहात लोकांना कसं वागायचं हे तुम्ही खडसावून सांगितलं. सभागृहात आलं तर शिस्तीत वागलंच पाहिजे. यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो. हे धन्यवाद ते कोण होते, कुठून आले, यामुळे नाही तर कोणताही व्यक्ती असला तरी सभागृहाची उंची पाळायला हवी. सभागृहाची एक मर्यादा आहे. मंत्री असो वा मुख्यमंत्री सर्वांनी सभागृहाचे पावित्र पाळायलाच हवेत. उद्या अगदी मुख्यमंत्री जरी तसे वागले तरी तुम्हाला त्यांचे कान उघडायचं काम करावं लागणार आहे, असं देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणालेत.

- Advertisement -

शिवसेना नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांच्या उपसभापती कार्य अहवाल पुस्तकाचे प्रकाशन सोहळा कार्यक्रम पार पडला. निलम गोऱ्हे यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रश्न तातडीने तडीस नेण्याची निलम गोऱ्हे यांची वृत्ती आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

“दिल्लीतील निर्भया प्रकरणापेक्षा भयंकर घटना महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात घडली होती. महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत. महिलांच्या अत्यचाराबाबत बोलत असताना त्यामध्ये जात-धर्म येता कामा नये. निर्भयाच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. अशा घटना जेव्हा महाराष्ट्रात घडतात. तेव्हा सर्व पक्षांनी एकत्र येऊन एक काम केले पाहिजे की, माझ्या पक्षाचा कार्यकर्ता असला तरी, दया माया क्षमा नाही. तसेच, महिलांच्या बाबतीत असे काही घडले तर आपण पक्षभेद विसरून एकत्र यायला पाहिजे. तुमचे सरकार आहे म्हणून, आम्ही बोंबलतोय आमचे सरकार आहे, म्हणून तुम्ही बोंबलताहेत, या बोंबलण्याला काही अर्थ नाही. हे कोरडे पण आहे. आताही सर्व महिला कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ही घटनेवर मार्ग काढला पाहिजे”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – 

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -