भाजप हा पक्ष आहे की चोरबाजार, उद्धव ठाकरेंची टीका

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली गावात शिवसेनेचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप हा भाकड पक्ष झाला आहे. विचार आणि नेते संपले आहेत. त्यांचे सर्व नेते आयात केलेले आहेत. हा आयात पक्ष आणि त्यांची दादागिरी सुरू आहे. या आयात पक्षाची दादागिरी मोडता येणार नाही का?, हा पक्ष आहे का चोरबाजार आहे. यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलं नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.

काश्मीरपासून कन्याकूमारीपर्यंत यादी काढा मग तुम्हाला समजेल की, यांच्या पक्षामध्ये आयात केलेले किती लोक आहेत. स्वत: चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, आम्ही मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच हा आयात पक्ष आहे. हा पक्ष आहे का चोरबाजार आहे. आपल्या पक्षातले नेते संपले की बाहेरून चोरून घ्यायचे. म्हणूनच माझा या ४० रेड्यांना सवाल आहे की, त्यांच्यामध्ये मर्दांगी शिल्लक असेल तर, त्यांनी जाहीर सांगावे की, आम्ही भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार नाही. त्यांना बाळासाहेबांचे नाव पाहिजे. चेहरा पाहिजे आणि मोदींचे आशिर्वाद पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : …तर गद्दारांनी सांगावे भाजपाच्या तिकिटावर लढणार नाही, उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला आवाहन

बुलढाण्यात आल्यानंतर काही जुने चेहरे दिसत नाहीत. पण जुने चेहरे फसवे निघाले, गद्दार निघाले. त्यांना असं वाटलं की बुलढाणा त्यांची मालमत्ता आहे. पण तुम्हाला पाहिल्यानंतर धगधगत्या मशाली असल्यासारखं वाटतेय. आपलं सरकार व्यवस्थित चाललं होतं. पण यांनी सरकार पाडलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कर्जमाफीची क्लिप ऐकवत उद्धव ठाकरेंनी त्यांना धारेवर धरलं. आज डीपी जळतायत, किती लोक तुमच्याकडे मदतीला येत आहेत. डीपी जळल्यानंतर पटकन तुम्हाला रिपेअर करून मिळतोय का?. वीजबिलाची वसुली थांबलेली आहे का चालू आहे, असे सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित करत फडणवीसांवर निशाणा साधला.


हेही वाचा : देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, उद्धव ठाकरेंचा घणाघात