माझं ‘तेच’ हिंदुत्व, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

uddhav thackreay

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. ‘माझी जीवनगाथा’चे इंग्रजीत भाषांतर करण्यात आलं आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाबाबत आणि विचारांबाबतच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

माझं ‘तेच’ हिंदुत्व

सध्या विचारांची गरज आहे. तसेच हे विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. मला काही जणं म्हणतात की, तुमचं हिंदुत्व आणि प्रबोधनकारांचं हिंदुत्व एकत्र आहे.असे काहीही नसून जे प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे, तेच हिंदुत्व बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे आणि बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे तेच माझं हिंदुत्व आहे. पण हे हिंदुत्व कुणाचं वाचून किंवा ऐकून आलेलं नाहीये. ज्याकाही गोष्टी आणि विचार आहेत. या सर्व गोष्टी प्रबोधनकारांच्या त्यांच्या त्या काळच्या अनुभवातून आल्या आहेत. स्पृश्य, अस्पृश्य आणि इतर जे काही विचार आहेत. ते त्यांच्या अनुभवातून शिकलेले आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रबोधनकारांचे वडील कोण होते?

ज्यावेळी प्लेग आला होता. त्यावेळी हा रोग खूप भयंकर होता. ज्या व्यक्तीला हा रोग व्हायचा त्याचा मृत्यू व्हायचा, अशी सर्व परिस्थिती होती. त्यावेळी शव देखील वाहून नेण्यासाठी कोणाची तयारी नसायची. त्यावेळी माझ्या आजोबांसह त्यांच्या मित्रमंडळींनी ही कामं केली. त्यामुळे माझ्या आजोबांना प्लेग झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. किमान लोकांमध्ये असलेली ही आमची सहावी पिढी आहे. त्यामुळे आम्ही जनतेत राहणारी आणि त्याच वंशातील लोकं आहोत.

या सर्व गोष्टीत राजकारण ज्या दिशेने चाललं आहे. त्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन व्हावं, म्हणून इंग्रजीत तुम्ही त्यांचं भाषांतर केलंत. हे फार महत्त्वाचं आहे. कारण मराठी मध्ये माझी जीवनकथा आहेच. पण प्रबोधनकारांचं कार्य आणि त्यांचे विचार हे इतर भाषिकांना सुद्धा कळावे. खरं हिंदुत्व आणि विचार काय आहे, हे त्यांना कळावं. त्यांचं काम तुम्ही केलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेले कार्यकर्ते आहोत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचे विचार आम्हाला पुढे घेऊन जायचे आहेत. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाशी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, धर्मवीर आनंद दिघे आमच्यासाठी दैवत आहेत. त्यांना बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे विचार दिले. तेच आम्हाला पुढे मिळाले. असे विधान एकनाथ शिंदे यांनी केले होते. तसेच आम्ही बंडखोरी केली नसून आम्ही उठाव केला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. परंतु उद्धव ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत प्रबोधनकारांचं हिंदुत्व तेच हिंदुत्व बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे आणि बाळासाहेबांचं हिंदुत्व तेच माझं हिंदुत्व आहे, असं म्हणत ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.


हेही वाचा : राजकारण हे तुमचं काम नाही, निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला