घरताज्या घडामोडीसगळे मंत्री आझाद, पद मिळूनही जबाबदारी नाही; उद्धव ठाकरेंचा टोला

सगळे मंत्री आझाद, पद मिळूनही जबाबदारी नाही; उद्धव ठाकरेंचा टोला

Subscribe

मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकाच्या ६२व्या वर्धापनदिनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. राज्यात महागाई आहे, पण बेकारी वाढत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. पण महाराष्ट्रातलं सरकार आहे कुठे? काहीही न करता स्वत:चे सत्कार करुन घेतले जात आहेत. पण अतिवृष्टीमुळे शेतकरी बेहाल झाला आहे. तिथे जायला मंत्री कुठे आहेत? मंत्र्यांचं ना खातेवाटप म्हणजे सगळे मंत्री आझाद आहेत, कोणावरही काहीही बंधनं नाहीत. आझादी का अमृत महोत्सव…मंत्र्यांचं आपलं चाललंय. पदं मिळाली आहेत, पण जबाबदारी नाही. करा मजा, मौज, मस्ती, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.

शिवसेना उघड्यावर पडलेली वस्तू

- Advertisement -

काही जणांना वाटतं की, शिवसेना उघड्यावर पडलेली वस्तू आहे. ती कोणीही उचलून घेऊन जाऊ शकते. तसं नाही आहे, शिवसेनेची पाळंमुळे 62 वर्ष सरळ सरळ दिसतंय. त्याच्या आधीपासून म्हणजेच माझ्या आजोबांनीसुद्धा विचारांची पेरणी केली. मार्मिकची सुरुवात झाली तेव्हा देशाचं स्वातंत्र्य 13 वर्षांचं होतं. मराठी माणसानं मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेची बिजे ही मार्मिकमध्ये

- Advertisement -

व्यंगचित्रकार काय असतो, व्यंगचित्रकार काय करू शकतो, त्याचं जगातलं उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना आहे. शिवसेना नसती तर महाराष्ट्रात मराठी माणसाचं आणि देशात हिंदूंचं काय झालं असतं हा विचार आज प्रत्येकाने केला पाहिजे. शिवसेना एका सकाळी पडलेलं स्वप्न म्हणून निर्माण झालेली नाही. शिवसेनेची बिजे ही मार्मिकमध्ये आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शस्त्र कुणाच्या हातात देणार?

स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजू लावून सीमेवर जे उभे आहेत. तिथे लष्करात कपात करणार आहेत. शस्त्र घेण्यासाठी माणसं कमी करणार असाल तर शस्त्र कुणाच्या हातात देणार? चीन, रशिया अमेरिकेने तरी आधुनिकीकरणासाठी लष्कर कपात केल्याचं माझ्या वाचनात नाही. लष्कर चालवण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत. पण राज्या-राज्यातील सरकारं पाडण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत हे कोणतं स्वातंत्र्य आहे?, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे.


हेही वाचा : …त्यांच्या नावात कितीही कुळे असले तरी शिवसेना नष्ट होणार नाही, उद्धव ठाकरेंचा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -