घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरएक दिवस 'ते' चारच लोक पक्षात राहतील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव...

एक दिवस ‘ते’ चारच लोक पक्षात राहतील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Subscribe

औरंगाबाद – उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिले आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिलदार नेते आहेत. ते माझे मित्र आहेत. उद्धव ठाकरेही आमचे मित्र होते. ते शरद पवारांच्या नादी लागले. उद्धव ठाकरेंबद्दल एक सांगतो. एक दिवस ते चार लोक पक्षात राहतील. माझे कुटुंब, माझी जबाबदारी अशी त्यांची अवस्था होईल. उद्धवजी, तुमचे उरलेले दोन चारजण वाचवा. नाही तर शिंदे साहेब तेही घेऊन पळतील. त्यामुळे टीका करणे सोडा, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली.

जन आक्रोश मोर्चावर टीका –

- Advertisement -

यावेळी चंद्रशेखर बावनकुळेंनी यावेळी शिवसेनेच्या जन आक्रोश मोर्चावर टीका केली. शिवसेनेला जन आक्रोश मोर्चा काढण्याचा अधिकार नाही. ते इव्हेंट मॅनेजमेट करत आहेत. अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे पक्षात नाराज नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

उद्धव ठाकरेंनी विचार करून बोलले पाहिजे –

- Advertisement -

उद्धव ठाकरे घाबरले आहेत. म्हणून मोठी भाषण सुरू आहेत. त्यामुळेच नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी विचार करून बोलले पाहिजे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे म्हणजे सूर्यासमोर दिवा आहे, त्यांचे नाव घेऊन बोलू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

शिंदे गटासोबत युती करून निवडणूक लढणार –

एकनाथ शिंदे यांना पंतप्रधान भेटले की नाहीत यावर तेच उत्तर देतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच आम्ही शिंदे गटासोबतच युती करून निवडणूक लढणार आहोत, असंही ते म्हणाले.

शिवाजी पार्क बाबत न्यायालया निर्णय घेईल –

शिवाजी पार्क बाबत न्यायालय जो निर्णय घेईल तो मान्य असायला हवा. मोदी आणि शहा याना बोलावलं असेल तर आनंदच आहे, असंही त्यांनी सांगितले. समाजामध्ये विश्वास निर्माण करणे हे आमचे काम आहे. आम्ही विश्वास निर्माण करण्यासाठी हे करतोय. मुस्लिम समाज आमच्या सोबत आहे, असे ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -